मोबाईल मार्केटमध्ये राज्य करण्यासाठी आला oppo चा झटपट चार्ज होणारा 5G फोन, असा हा घ्या स्वस्तात
मोबाईल मार्केटमध्ये राज्य करण्यासाठी ओप्पोने नवा झटपट चार्ज होणारा 5G फोन आणला आहे, हा फोन मिडीयम रेंजसाठी सर्वात्तम पर्याय आहे.
मुंबई : OPPO Reno8T या फोनला अलिकडेच लॉंच करण्यात आले असून त्याची किंमत 29,999 रुपये आहे, तर Enco Air3 इअर बड्सची किंमत 2,999 रुपये आहे. दोन्ही उत्पादनाची विक्री आजपासून सुरू झाली आहे. हे फोन ओप्पो स्टोअर, फ्लिपकार्ट आणि मेनलाईन रिटेल आऊटलेटमध्ये मिळत आहेत.OPPO ने OPPO Reno8 T आणि Enco Air3 वर काही ऑफर्स आणि डिस्काउंटची घोषणा केली आहे. हे दोन्ही प्रोडक्ट खूपच स्वस्तात विकत घेता येतील. दोन्ही प्रोडक्ट्स वर धमाकेदार बँक ऑफर दिल्या जात आहेत,
OPPO Reno8T, Enco Air3 Retail offers
दोन्ही प्रोडक्ट्स वर धमाकेदार बँक ऑफर दिल्या जात आहेत, ग्राहकांना आयसीआयसीआय बँक, एसबीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बॅंक, वन कार्ड, एयू स्मॉल फायनान्स बॅंक इंडसइंड बॅंकने सहा महिन्यापर्यंत दहा टक्के कॅशबॅक आणि नो कॉस ईएमआयचा पर्याय आहे. ग्राहक कॅशफायच्या माध्यमातून ओप्पो फोनमध्ये अपग्रेट करून दोन हजार रूपयापर्यंत एक्सचेंज बोनस अधिक 1000 रूपयांपर्यत लॉयल्टी बोनसचा लाभ घेऊ शकता.
OPPO Reno8T, Enco Air3 Online Offer
Reno8 T 5G वर 3,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर लागू आहे. कोटक बँक, HDFC, येस बँक आणि SBI द्वारे Reno8 T 5G खरेदी करण्यावर तुम्ही 10 टक्के इन्स्टंट बँक सवलत मिळवू शकता.
OPPO Reno8T 5G Specifications
OPPO Reno8 T 5G मध्ये मायक्रो कर्व्ह डिझाइन उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे आणि तो 120Hz रिफ्रेश रेटसह मिळत आहे
Reno8 T 5G कॅमेरा
Reno8 T 5G मध्ये 108MP पोर्ट्रेट कॅमेरा आहे आणि अल्ट्रा-क्लीअर, उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा कॅप्चर करण्यासाठी OPPO च्या AI पोर्ट्रेट सुपर रिझोल्यूशन अल्गोरिदमचा वापर केला आहे.
OPPO Reno8 T 5G बॅटरी
स्मार्टफोनमध्ये 4,800mAh बॅटरी आहे जी Oppo च्या 67W SuperVOOCTM फास्ट-चार्जिंग तंत्रज्ञानासह 45 मिनिटांत 100 टक्के चार्ज होते