Paytm new feature : कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार तुमची गाडी ? Paytm वरून कळेल माहिती
डिजीटल पेमेंटच्या जमान्यातील महत्वाचे ॲप असणाऱ्या पेटीएममध्ये लवकरच एक नवे फीचर जोडले जाणार आहे. त्याद्वारे युजर्स Live Train Status जाणून घेऊ शकतात. तसेच ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्म येईल हेही पेटीएमद्वारे जाणून घेता येईल असा दावा कंपनीने केला आहे.
भारतातील प्रसिद्ध डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम ॲपने (Paytm app) एका नव्या अपडेटची घोषणा केली आहे. ट्रेनच्या स्टेटससंदर्भात एक नवे अपडेट करण्यात आल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. या नव्या फीचरद्वारे युजर्स Live Train Status जाणून घेऊ शकतात. तसेच ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्म येईल हेही पेटीएमद्वारे जाणून घेता येईल, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. रिपोर्टसनुसार, पेटीएम युजर्स आता त्यांच्या गाडीचे लाइव्ह स्टेटस पेटीएम ॲपद्वारे ट्रॅक ( live status of train can be tracked) करू शकतात. हे अतिशय महत्वपूर्ण आणि लाभदायी ठरेल. ट्रेन डिटेल्स चेक करण्यासाठी आजकाल बरेच लोक गूगल मॅपचाही (google maps) उपयोग करत असतात. मात्र त्यामध्ये एखाद्या चालत्या ट्रेनचे स्टेटस दिसते.
या सुविधांद्वारे जर तुम्हाला जास्त डिटेल्स मिळाल्या नाहीत तर तुम्ही IRCTCच्या वेबसाईटद्वारेही ट्रेनचे लाइव्ह लोकेशन आणि स्टेटस शोधू शकता. पेटीएमच्या या नव्या फीचरमुळे तुमची ट्रेन कुठे आहे ते तर तुम्हाला समजेलच, पण स्टेशनवर ती कुठल्या प्लॅटफॉर्मवर येईल, याची माहितीही ॲपवरून कळू शकेल, असा दावा कंपीनतर्फे करण्यात येत आहे.
पेटीमच्या या फीचरद्वारे गाडीचे लाइव्ह लोकेशन चेक करता येऊ शकते. Live Train Status फीचर शिवाय, युजर्स गाडीचे तिकीट बूक करण्यापूर्वी त्यासाठी गरजेच्या असलेली कागदपत्रं कोणती याची माहितीही ॲपवर शोधू शकतात, असे कंपनीद्वारे सांगण्यात आले आहे.
तसेच जे युजर्स पेटीएम ॲप वापरतात, ते आता ट्रेनचे तिकीटही बूक करू शकतात. तसेच पीएनआर (PNR) आणि ट्रेन स्टेटसही चेक करू शकतात, जेवणही ऑर्डर करू शकतात. तसेत 24×7 कस्टमर सपोर्टचा फायदा घेऊ शकतात. या ॲपवरून युजर्स, हिंदी, बंगाली, मराठी , तेलगु, तामिळ, गुजराती, कन्नड , मल्याळम, पंजाबी, ओडिया आणि अन्य भाषांमध्येही तिकीट बूक करू शकतात.
यासाठी कोणतेही अतिरिक्त किंवा हिडन (hidden cost) शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच या ॲपचा वापर करताना युजर्स ज्येष्ठ नागरिकांच्या कोट्याचाही लाभ घेऊ शकतात. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक लोअर बर्थचे तिकीट बूक करू शकतात.