तब्बल 50 कोटी फेसबुक युजर्सचे फोन नंबर टेलिग्रामवर विकले जात असल्याचा दावा
फेसबुकवरुन डेटा लीक झाल्याच्या बातम्या आपण यापूर्वी अनेकदा वाचल्या आहेत. आता फेसबुकबाबत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मुंबई : फेसबुकवरुन डेटा लीक झाल्याच्या बातम्या आपण यापूर्वी अनेकदा वाचल्या आहेत. आता फेसबुकबाबत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अशी माहिती मिळाली आहे की, फेसबुकवरील 500 मिलियन (50 कोटी) युजर्सचे फोन नंबर्स बॉटद्वारे टेलिग्रामवर विकले जात आहेत. (Phone numbers of nearly 500 million Facebook users up for sale via Telegram bot)
ज्या सिक्युरिटी रिसर्चरने टेलीग्रामवर बॉट बनवला आहे, त्यांनीच दावा केला आहे की, त्यांच्याकडे अशा डेटाबेसचा अॅक्सेस आहे ज्यामध्ये तब्बल 500 मिलियन फेसबुक युजर्सचे फोन नंबर्स आहेत. त्यांनी असं म्हटलंय की, 2020 च्या सुरुवातीला फेसबुकच्या काही त्रुटींबद्दल त्यांना माहिती मिळाली होती. फेसबुकच्या डेटा सिक्युरिटीमधील काही त्रुटींमुळे लोकांचे फेसबुकशी लिंक्ड असलेले फोन नंबर एक्सपोज झाले होते. आता तेच फोन नंबर बॉटद्वारे खूपच कमी किंमतीत विकले जात आहेत.
मदरबोर्डच्या एका रिपोर्टनुसार टेलिग्रामचा हा बॉट फेसबुक आयडीद्वारे युजर्सचे फोन नंबर सांगतो. परंतु केवळ ज्यांच्या फेसबुक डेटा ब्रीचमध्ये लीक झाला होता, केवळ त्यांचेच फोन नंबर बॉटद्वारे विकले जाता आहेत. परंतु त्यासाठी बॉटला फेसबुक आयडीसाठी किंवा फोन नंबरसाठी 20 डॉलर्स (1460 रुपये) द्यावे लागणार आहेत. कारण टेलिग्राम बॉट फोन नंबर्स बल्कमध्ये विकत आहे. बॉटकडून फेसबुक युजर्सचा डेटा बल्कमध्ये विकला जातोय. त्यासाठी बॉटला तब्बल 5 हजार डॉलर्स (जवळपास 3,65,160 रुपये) मिळत आहेत.
सिक्युरिटी रिसर्चरचं म्हणणं आहे की, खूप मोठ्या प्रमाणात डेटाबेस सायबर क्राईम कम्युनिटीजमध्ये विकला जातोय, त्यामुळे लोकांची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. फ्रॉड अॅक्टिव्हिटींसाठी सायबर क्रिमिनिल्स या डेटाचा वापर करु शकतील. लोकांच्या सुरक्षिततेवर याचे गंभीर परिणाम होतील.
In early 2020 a vulnerability that enabled seeing the phone number linked to every Facebook account was exploited, creating a database containing the information 533m users across all countries.
It was severely under-reported and today the database became much more worrisome 1/2 pic.twitter.com/ryQ5HuF1Cm
— Alon Gal (Under the Breach) (@UnderTheBreach) January 14, 2021
संबंधित बातम्या
प्रायव्हसी पॉलिसीवर मोदी सरकारच्या कठोर भूमिकेनंतर WhatsApp चं मोठं वक्तव्य; कंपनी म्हणते…
WhatsApp | माहिती लीक होण्याची भीती? असा करा व्हॉट्सअॅपचा जुना डेटा डिलीट…
Privacy भंग होत असल्यास WhatsApp डिलीट करा : दिल्ली हायकोर्ट
WhatsApp विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, नवे गोपनीयता धोरण बरखास्त करण्याची मागणी
WhatsApp, Signal, Telegram सारख्या 15 मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील मेसेजला एकाच अॅपने रिप्लाय करा
भारतीय युजर्सशी भेदभाव का? WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन केंद्र सरकारचा हायकोर्टाला सवाल
(Phone numbers of nearly 500 million Facebook users up for sale via Telegram bot)