8GB/256GB, 20MP सेल्फी कॅमेरा, Poco चा नवा फोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

पोको (Poco) कंपनीने आज भारतात एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात कंपनी दोन नवीन हँडसेट लाँच करु शकते.

8GB/256GB, 20MP सेल्फी कॅमेरा, Poco चा नवा फोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Poco Logo
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 12:24 PM

मुंबई : पोको (Poco) कंपनीने आज भारतात एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात कंपनी दोन नवीन हँडसेट लाँच करु शकते. या यादीमध्ये पोको एफ 3 (Poco F3) आणि पोको एक्स 3 प्रोचा (Poco X3 Pro) समावेश असेल. हा एक व्हर्च्युअल कार्यक्रम असेल, आज सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. पोको कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल. (Poco F3 and Poco X3 Pro to launch today: know expected specifications, features)

पोको एफ 3 मध्ये काय खास असेल, असा प्रश्न अनेकांना पडला असेल, चला तर मग जाणून घेऊयात कसा असेल पोकोचा हा नवा हँडसेट. हा स्मार्टफोन रेडमी के 40 चं पुढचं व्हर्जन असेल. रेडमी के 40 नुकताच चीनी बाजारात दाखल झाला आहे. लीक्स्टर ईशान अग्रवाल यांच्या मते, पोकॉ एफ 3 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 875 जी प्रोसेसरसह लॉन्च केला जाऊ शकतो. फोनमध्ये एक छोटा पंच होल कॅमेरा दिला जाऊ शकतो. बॅक पॅनेलमध्ये एक व्हर्टिकल कॅमेरा देण्यात येईल, जो 4 कॅमेरा सेन्सर्ससह येईल.

Poco F3 चे फीचर्स

पोको एफ 3 स्मार्टफोन 6.67 इंच एमोलेड डिस्प्ले आणि फुल एचडी + रेझोल्यूशनसह येईल. हा 120 हर्ट्झच्या रीफ्रेश रेटसह येईल. स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह यात 8 जीबी रॅमही मिळेल. फोनच्या मागील बाजूस 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर देण्यात येईल. सेल्फीसाठी फोनमध्ये 20-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा असेल. तसेच या फोनमध्ये 4520mAh बॅटरी असेल, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन अँड्रॉयड 11 वर आधारीत असेल.

कसा असेल Poco X3 Pro

पोको एक्स 3 प्रो बद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला जाईल जो फुल एचडी + डिस्प्लेसह येईल. हा फोन 120 हर्ट्ज रीफ्रेश रेट, 240 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शनसह येईल. जर आपण याच्या कॅमेर्‍याबद्दल चर्चा केली तर या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा ड्युअल सेन्सर असेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. तसेच या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर देण्यात येईल. हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह सादर केला जाईल.

या फोनमध्ये 5160mAh क्षमतेची बॅटरी असेल, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केली जाईल. या फोनमध्ये साइड माऊंट फिंगरप्रिंट सेन्सर, अँड्रॉइड 11, ब्लूटूथ 5.0 आणि NFC असेल.

इतर बातम्या

पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार हे स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Samsung Galaxy M12 चा धुमाकूळ, अमेझॉनवर सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोन्सच्या यादीत अव्वल

हजाराच्या चार्जरसाठी कोट्यवधींचा दंड, Apple ला ‘या’ देशाचा जोरका झटका

(Poco F3 and Poco X3 Pro to launch today: know expected specifications, features)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.