लेटेस्ट चिपसेटसह Poco F5 स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सवलत
गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता असलेला पोको F5 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. लेटेस्ट चिपसेट असल्याने या स्मार्टफोनबाबत कुतुहूल निर्माण झालं आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, कंपनीची वेबसाईट आणि रिटेल स्टोर्समधून विकत घेता येईल.
मुंबई : पोको कंपनीने भारतात नवा कोरा Poco F5 स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7+ Gen 2 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन गेम खेळणाऱ्या युजर्ससाठी जबरदस्त आहे. त्यामुळे व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी करताना चांगला अनुभव मिळणआर आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 13 ला सपोर्ट करणारा असल्याने नंतर अपडेटही केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन इतर डिव्हाइसच्या तुलनेत चांगल्या प्रकारे वायफाय सिग्नल कॅच करू शकतो. हा फोन एचडीआर मोड, डॉल्बी विजन आणि डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतो. त्यामुळे या स्मार्टफोनवर चित्रपट, वेब सिरीज पाहणं चांगली अनुभूती देईल.
Poco F5 चा कॅमेरा
Poco F5 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. यात 64 मेगापिक्सल प्रायमरी, 8 एमपी अल्ट्रा वाइट आणि 2 एमपी मायक्रो कॅमेरा सेटअप आहे. व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी यात 16 एमपी फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये फिल्म कॅमेरा फीचरही दिलं आहे. यामुळे चांगल्या क्वालिटीचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास मदत होईल.
The King of the segment gets set to fare well against competition. JK, what competition? There’s none. Isn’t the #POCOF5 King for a reason?! ✨? pic.twitter.com/RzIHoTfRtc
— POCO India (@IndiaPOCO) May 9, 2023
Poco F5 ची बॅटरी
या स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन एकदा चार्ज केला की दिवसभर आरामात वापरू शकता. या व्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये 67 व्हॅटचा फास्ट चार्जिंग दिलं आहे. हा स्मार्टफोन 46 मिनिटात 0 ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो.
The POCO F5 comes in 2 variants – 8GB/256GB & 12GB/256GB, starting at ₹29,999 & ₹33,999 respectively.
Now, here's the King's special launch offer just for you. Get an additional ICICI bank offer of ₹3000 or an exchange discount worth ₹3000. ?#POCOF5 #ReturnOfTheKing pic.twitter.com/eKUZBaSuOh
— POCO India (@IndiaPOCO) May 9, 2023
Poco F5 ची किंमत
Poco F5 च्या 8GB/256GB व्हेरियंटची किंमत 29,999 रुपये आहे. 12GB/ 256GB स्टोरेजची किमंत 33,999 रुपये आहे. हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे. कार्बन ब्लॅक, इलेक्ट्रिक ब्लू आणि स्नोस्टॉर्म व्हाईट असे तीन रंग आहेत. या स्मार्टफोनवर बँक डिस्काउंट देण्यात आला आहे.
आयसीआयसीआय कार्डने फोन घेतल्यास 3 हजार रुपयांची सवलत आहे. त्यामुळे दोन्ही व्हेरियंटची किंमत सवलत मिळाल्यानंतर अनु्क्रम 26,999 आणि 30,999 रुपये होईल. त्याचबरोबत जुना फोन एक्स्चेंज केल्यास 3 हजार रुपयांचा फायदा दिला जाईल. पोको लॉयलिटी प्रोग्राम अंतर्गत जुन्या पोको फोनवर अतिरिक्त 1000 रुपयांची सवलत मिळेल. या स्मार्टफोन एका वर्षाची अतिरिक्त वॉरंटी दिली गेली आहे.