आऊट ऑफ स्टॉक झालेला POCO चा दमदार स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यास परतला
POCO India कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला भारतात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे.
मुंबई : POCO India कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला भारतात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचं नाव POCO M3 असं असून हा स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. विक्रीसाठी उपलब्ध होताच काही वेळातच हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. त्यानंतर हा फोन आता पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. (Poco M3 Smartphone with 6000mAh battery re-available for sale with discount and cashback offers)
POCO M3 हा स्मार्टफोन आज दुपारपासून Flipkart या ई-कॉमर्स साईटवर विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. हा स्मार्टफोन 2 फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात आला होता. 9 फेब्रुवारीला या फोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर काही वेळात या फोनच्या सर्व युनिट्सची विक्री झाल्यामुळे हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. आजपासून हा स्मार्टफोन पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
फ्लिपकार्टवर उपलब्ध
POCO M3 एक्सक्लूसिव्हली ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन कूल ब्लू, पॉवर ब्लॅक आणि येल्लो या कलर ऑप्शन्ससह लाँच केला आहे. या फोनचा टीझर पाहिल्यानंतर युजर्समध्ये या स्मार्टफोनबाबत खूप क्रेझ निर्माण झाली होती. कंपनीने POCO M3 हा स्मार्टफोन इंडोनेशियात आधीच लाँच केला होता. तेव्हापासून या फोनबाबत भारतीय युजर्समध्ये मोठी उत्सुकता होती. त्यामुळे हा फोन भारतीय युजर्सच्या पसंतीस उतरेल आणि याची मोठ्या प्रमाणात विक्री होईल, असे अंदाज वर्तवण्यात येत होते. अपेक्षेप्रमाणे या फोनने भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे.
किफायतशीर किंमत
कंपनीने POCO M3 स्मार्टफोनचे दोन वेरिएंट्स सादर केले आहेत. ज्यामध्ये 6GB RAM आणि 64GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये इतकी आहे, तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662G प्रोसेसरवर चालतो. फ्लिपकार्टवर 9 फेब्रुवारीपासून या फोनचा पहिला सेल सुरु होईल.
जबरदस्त फीचर्स
Poco M3 या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले वॉटरड्रॉप स्टाईल नॉचसह सादर करण्यात आला आहे. पोको एम 3 स्मार्टफोन गुगलच्या अँड्रॉयड 11 ऑपरेटिंग सिस्टिम बेस्ड एमआययूआय वर आधारित आहे. फोनमध्ये 6000 MAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पोको एम 3 स्मार्टफोन OnePlus 8T Cyberpunk 2077 स्पेशल एडिशन प्रमाणे डिझाइन करण्यात आलेला आहे. फोन ड्युअल टोन फिनिश आणि पोको ब्रँडिंग कॅमेर्यासह सादर करण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी Poco M3 या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा (रियर कॅमेरा) देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेंसर सपोर्ट आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सला कॅमेरा देण्यात आला आहे.
#Alert: All those who couldn’t get the Killer Looks, OP Performer last time, this announcement is for you!#POCOM3 sale begins tomorrow at 12PM on @Flipkart: https://t.co/npDCHkpSMb Set your reminders now! pic.twitter.com/faz1WhqT0R
— POCO India #POCOM3 (@IndiaPOCO) February 15, 2021
हेही वाचा
128GB स्टोरेज, तगडा बॅटरी बॅकअप, ‘हा’ स्मार्टफोन किफायतशीर दरात मिळणार
OnePlus Nord, Realme X7 5G ला टक्कर, Samsung चा Galaxy F62 लाँच, जाणून घ्या फीचर्स
‘हे’ आहेत देशातील बेस्ट 5G स्मार्टफोन्स, किंमती 19999 रुपयांपासून…
6.5 इंच HD+ डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, Moto चा दमदार स्मार्टफोन येणार, किंमत 10 हजारांहून कमी
(Poco M3 Smartphone with 6000mAh battery re-available for sale with discount and cashback offers)