Poco M4 5G आज लॉन्च होणार, जाणून घ्या काय असेल किंमत आणि फिचर्स

Poco M4 5G हा स्मार्टफोन भारतात 29 एप्रिल म्हणजेच आज लॉन्च होणार आहे. तशी माहिती कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिलीय. या स्मार्टफोनची भारतातील किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

Poco M4 5G आज लॉन्च होणार, जाणून घ्या काय असेल किंमत आणि फिचर्स
Poco M4 5GImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 5:30 AM

मुंबई : POCO भारतात आपला नवा स्मार्ट फोन लॉन्च करत आहे, ज्याचं नाव असेल poco M4 5G असणार आहे. हा स्मार्टफोन भारतात 29 एप्रिल म्हणजेच आज लॉन्च होणार आहे. तशी माहिती कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिलीय. या स्मार्टफोनची भारतातील किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने अद्याप तरी किंमतीबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही. यात बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची संभाव्य वैशिष्ट्ये आणि अन्य माहिती जाणून घेऊया.

Poco M4 5G चं डिझाईनही दमदार असेल आणि स्पीडबाबतही हा एक चांगला स्मार्टफोन असेल असा दावा खुद्द कंपनीनेच केलाय. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आलं आहे, ज्यात बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. तर Poco M3 मध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे.

Poco M3 प्रमाणेच असेल डिझाईन

कंपनीने आतापर्यंत हा स्मार्टफोन समोरून दाखवलेला नाही किंवा त्याचा एखादा फोटोही बाहेर आणलेला नाही. बजेट स्मार्टफोन असल्यामुळे यात वॉटरड्रॉप स्टाईलचा कॅमेरा कटआऊट मिळेल. हे डिझाईन Poco M3 प्रमाणे असल्याचं वाटतं. हा स्मार्टफोन यलो आमि ब्ल्यू या दोन कलरमध्ये उपलब्ध होणार आहे.

हे सुद्धा वाचा

M3 Pro 5G मॉडलप्रमाणे स्पेसिफिकेशन असेल

सुरु असलेल्या चर्चेनुसार अपकमिंग स्मार्टफोन Poco M4 5G चं स्पेसिफिकेशन Poco M3 Pro 5G मॉडेलशी मिळते जुळते असण्याची शक्यता आहे. Poco M4 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सटी 700 चिपसेट मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

Poco M4 5G चा कॅमेरा लेन्स

मिळालेल्या माहितीनुसार यात बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. यात प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल तर सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे, जो मॅक्रो सेन्सर आहे. तर समोरच्या बाजूला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.