लाँचिंगपूर्वी Micromax In series ची युट्यूबवर झलक; ‘हे’ फिचर्स असणार

भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्स पुन्हा एकदा मार्केटमध्ये एंट्री करत आहे.

लाँचिंगपूर्वी Micromax In series ची युट्यूबवर झलक; 'हे' फिचर्स असणार
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 9:45 AM

मुंबई : भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्स (Micromax) पुन्हा एकदा मार्केटमध्ये एंट्री करत आहे. कंपनी आज (3 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजता त्यांच्या नव्या In सिरीजमधील स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ आहे. मार्केटमध्ये कमबॅक करण्यापूर्वी मायक्रोमॅक्स कंपनी सातत्याने सोशल मीडियावर नव्या स्मार्टफोनची जाहिरात करत आहे.

मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी युट्यूबर टेक्निकल गुरुजीसोबत नवीन स्मार्टफोनची एक झलक दाखवली आहे. युटयूबवर शेअर केलेल्या टीजर व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, मायक्रोमॅक्सचा नवीन In 1A ग्रीन आणि व्हाईट या दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. यूट्यूब व्हिडीओमध्ये Micromax In 1A या स्मार्टफोनच्या डिझाईनची माहिती देण्यात आली आहे. in 1A पूर्णपणे ऑनर 9X आणि नार्झो 20 प्रोसारखा आहे.

मायक्रोमॅक्सच्या इन-सिरीजमध्ये दोन स्मार्टफोनचा (Micromax In 1 आणि Micromax In 1A) समावेश असेल. यापैकी पहिल्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर असेल. या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 7 ते 15 हजार रुपयांपर्यंत असेल.

मिळालेल्या माहितीनुसार MediaTek Helio G35 प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन 2GB रॅम + 32GB स्टोरेज आणि 3GB रॅम + 32GB स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. Micromax In 1a मध्ये 5000mAh ची बॅटरी असेल, तर Micromax In 1 मध्ये 4500mAh ची बॅटरी असू शकते.

दोन जीबी रॅम असलेल्या फोनमध्ये 13+2 मेगापिक्सल्सचा डुअल रियर कॅमरा सेटअप आणि 8 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. तर 3GB रॅम असलेल्या फोनमध्ये 13+5+2 मेगापिक्सल्सचा ट्रिपल रियर कॅमरा सेटअप असेल सोबत 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.

Micromax In 1 मध्ये 48 मेगापिक्सल चा प्रायमरी सेन्सर मिळू शकतो. तसेच Micromax In 1a मध्ये रियर पॅनल व 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकतो.

संबंधित बातम्या

Xiaomi चा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोल्डेबल फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

Amazon Sale : सॅमसंग, शाओमी, विवोच्या ‘या’ बजेट स्मार्टफोन्सवर भरघोस सूट

Redmi K30S लाँच, 8 जीबी रॅम, 5000mAh च्या बॅटरीसह दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Motorola चा किफायतशीर 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

(preview of Micromax In series releases on YouTube before its launch)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.