Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar Card | ‘आधार’शी नेमका कोणता मोबाईल क्रमांक जोडलाय? केवळ 5 मिनिटांत मिळेल उत्तर!

बऱ्याचदा आपण आपला नंबर बदलतो आणि या गोंधळात नेमका कुठला नंबर आधारसह नोंदणीकृत केला आहे, हेच विसरून जातो.

Aadhaar Card | ‘आधार’शी नेमका कोणता मोबाईल क्रमांक जोडलाय? केवळ 5 मिनिटांत मिळेल उत्तर!
Aadhaar Card Uidai
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 7:32 PM

मुंबई : ‘आधार कार्ड’ (Aadhaar Card) हे आजच्या घडीला आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. बँकेत खाते उघडायचे असेल किंवा रेशन दुकानावर धान्य घ्यायचे असेल, प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या नियमांप्रमाणे आपल्या सर्वांचेच आधार कार्ड असेल. परंतु, आपण आधारमध्ये कोणता मोबाईल नंबर (Mobile Number) नोंदवला आहे, हे बऱ्याचदा विसरायला होते. आपला मोबाईल नंबर आधारसह जोडलेला असणे महत्त्वाचे आहे (Process to Check which mobile number you have given in your Aadhaar card data).

बऱ्याचदा आपण आपला नंबर बदलतो आणि या गोंधळात नेमका कुठला नंबर आधारसह नोंदणीकृत केला आहे हेच विसरून जातो. अशावेळी या सोप्या मार्गाने आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो.

अशा प्रकारे मिळेल नोंदणीकृत क्रमांकाची माहिती…

आपला नंबर आधार डेटाबेसमध्ये नोंदणीकृत आहे की नाही, हे शोधण्यासाठी आपल्याला प्रथम www.uidai.gov.in च्या पोर्टलवर जाणे आवश्यक आहे. यानंतर, ‘माझा आधार’ टॅबमधील सत्यापित ईमेल किंवा मोबाइल नंबरवर क्लिक करा. यानंतर आपल्या सिस्टमवर एक नवीन टॅब उघडेल. तेथे आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा. आपण ज्यापैकी सत्यापित करू इच्छिता, त्याचा मोबाईल नंबर आणि ई-मेल प्रविष्ट करा. यानंतर कॅप्चा कोड टाका (Process to Check which mobile number you have given in your Aadhaar card data).

मोबाईल नंबर अद्ययावत करण्यासाठी शुल्क

प्रविष्ट केलेला मोबाईल नंबर आधार डेटाबेसशी जुळत असल्यास, आपल्या स्क्रीनवर एक संदेश येईल की, आपण प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक आधीच रेकॉर्डमध्ये सत्यापित आहे. जर आपला नंबर विद्यमान डेटाशी जुळत नसेल तर, आपल्याला सांगितले जाईल की, प्रविष्ट केलेला मोबाईल नंबर रेकॉर्डशी जुळत नाही. यानंतर तुम्हाला तुमचा नंबर नव्याने नोंदवावा लागेल.

आपला नंबर आधारमध्ये नोंदवण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. तेथे मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये फी भरावी लागेल. लक्षात ठेवा की, मोबाईल नंबर आधारमध्ये अपडेट करण्याची प्रक्रिया ऑनलाईन होत नाही. यासाठी जवळच्या अधिकृत आधार केंद्राला भेट देणे गरजेचे आहे.

(Process to Check which mobile number you have given in your Aadhaar card data)

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....