पब्जी गेमचा विक्रम, जगातील सर्वाधिक कमाई करणार अॅप
गातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अॅपच्या यादीत पब्जी अॅपचा समावेश झाला आहे. सध्या पब्जी अॅपने मे महिन्यात एका दिवसाला तब्बल 48 लाख डॉलर्सची कमाई (अंदाजे 33 कोटी) केली आहे.
मुंबई : जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अॅपच्या यादीत पब्जी अॅपचा समावेश झाला आहे. सध्या पब्जी अॅपने मे महिन्यात एका दिवसाला तब्बल 48 लाख डॉलर्सची कमाई (अंदाजे 33 कोटी) केली आहे. ‘पब्जी मोबाईल’ आणि नवी व्हर्जन ‘गेम फॉर पीस’मुळे चीन च्या इंटरनेट पॉवरहाऊस टेनेसेंटच्या कमाईत ही वाढ झाली आहे. पब्जी आता जगातील सर्वाधिक कमाई करणारा अॅप बनला आहे.
पब्जीने मुळात कोटी डॉलर्सच्या रुपयात कमाई केली आहे. चिनच्या अँड्रॉईड माध्यमातून मिळालेल्या कमाईचा समावेश जर केला, तर 14.6 कोटी डॉलर्सची कमाई पब्जी अॅपने केली आहे. गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये पब्जीने 65 कोटी डॉलर्सची कमाई केली होती. पब्जी मोबाईल, गेम फॉर पीसने मे महिन्यात एकूण कमाई अॅप्पलकडून जवळपास 10.1 कोटी, गुगलच्या प्लॅटफॉर्मवरुन 4.53 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पब्जीच्या कमाईने कंपनीला मोठा फायदा झाल्याचे दिसत आहे.
पब्जी गेम लाँच झाल्यापासून मोठ्या प्रमाणात पब्जी गेमचे चाहते निर्माण झाले आहेत. आजही अनेकजण आहेत जे पब्जी गेमच्या आहारी गेले आहेत. या गेममुळे आतापर्यंत अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर काही जणांना आपले मानसिकता गमवावी लागली आहे. सरकार कडूनही या गेमवर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे. मात्र असे असतानाही पब्जीने जगातील सर्वाधिका कमाई करणाऱ्या अॅपच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला आहे.