अयोध्येतील राम मंदिरासाठी करा दान; मग असा वाचवा टॅक्स

Ram Temple Save Tax | अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्यदिव्य मंदिर अंतिम टप्प्यात आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला ऑनलाईन दान केल्यास कराची बचत होऊ शकते. आयकर अधिनियमातंर्गत भाविकाला एका ठराविक रक्कमेवर कर बचतीचा लाभ घेता येईल. कुठे आणि कसे करावे दान आणि कसा मिळेल लाभ, जाणून घ्या.

अयोध्येतील राम मंदिरासाठी करा दान; मग असा वाचवा टॅक्स
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 9:34 AM

नवी दिल्ली | 21 January 2024 : अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होत आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, राम मंदिराच्या उभारणीचे काम करत आहे. हा ट्रस्ट केंद्र सरकारने तयार केला आहे. राम मंदिरात दान करण्यासाठी ही अधिकृत संस्था आहे. भाविक भक्त ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने दान करु शकता. अथवा प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर त्यांना अयोध्येत जाऊन दान करता येईल. राम मंदिराच्या बांधणीसाठी भाविकांना, नागरिकांना खारीचा वाटा उचलता येईल. युपीआय, क्यूआर कोड, एनईएफटी, आयएमपीएस, डिमांड ड्राफ, धनादेश याद्वारे भक्तांना दान करता येईल. विशेष म्हणजे एका ठराविक रक्कमेवर आयकर अधिनियमातंर्गत त्यांना कर सवलतीचा लाभ घेता येईल.

पण पावती नाही मिळणार लगेच

तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर दान करत असाल तर एक महत्वाची नोंद ठेवा. दान केल्यानंतर त्या रक्कमेची पावती लागलीच तुम्हाला मिळणार नाही. युपीआय, क्यूआर कोड, एनईएफटी, आयएमपीएस, डिमांड ड्राफ, धनादेश याद्वारे दान केले असेल तर पावतीसाठी तुम्हाला काही काळ प्रतिक्षा करावी लागेल. पावती डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला 15 दिवसांची प्रतिक्षा करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पावती डाऊनलोड करता येईल.

हे सुद्धा वाचा

इनकम टॅक्समध्ये असा फायदा

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला केंद्र सरकारने ऐतिहासिक स्थान आणि प्रसिद्ध सार्वजनिक पुजेचे स्थळ म्हणून नोटिफाय केले आहे. त्यामुळे जी व्यक्ती या मंदिराला दान देईल, त्या रक्कमेवर आयकर खात्यातंर्गत कर सवलतीस पात्र ठरेल. दानातील अर्धी रक्कम आयकर अधिनियमाच्या 80 जी (2) (बी) अंतर्गत डिडक्शनास पात्र असेल. पण 2000 रुपयांच्या वरील रक्कमेवर टॅक्स डिडक्शनचा लाभ घेता येणार नाही. दोन हजार रुपयांच्या रक्कमेवर नियमानुसार, कर सवलतीचा लाभ घेता येईल.

कसे करता येईल दान

  • https://online.srjbtkshetra.org/#/login वर जा
  • डोनेशन टॅबवरील डोनेट पर्यायावर क्लिक करा.
  • मोबाईल क्रमांकावरुन लॉगिन करा. ओटीपी टाकून प्रवेश करा.
  • एक नवीन वेबपेज उघडेल. पॅन, दानाचा उद्देश, दान रक्कम, पत्ता, पिन कोड तपशील भरा
  • आता डोनेट पर्यायावर क्लिक करा, पेमेंट गेटवेला रीडायरेक्ट करा
  • युपीआय, डेबिट,क्रेडिट कार्ड, नेट बॅकिंगद्वारे पेमेंट करा.
  • यूपीआई/क्यूआर कोड/चेक/डिमांड ड्राफ्ट/आईएमपीएस/एनईएफटीद्वारे पण दान करता येईल
  • https://online.srjbtkshetra.org/donation-receipt/ वर जाऊन पावती डाऊनलोड करा
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.