8GB/128GB, 108MP कॅमेरासह Realme दमदार स्मार्टफोन लाँच करणार
रियलमीने एक नवीन टीझर जारी केला आहे ज्यामध्ये कंपनीने 108 मेगापिक्सल कॅमेर्यासह नव्या स्मार्टफोनची झलक दाखवली आहे.
नवी दिल्ली : रियलमी (Realme) कंपनीने एक नवीन टीझर जारी केला आहे ज्यामध्ये कंपनीने 108 मेगापिक्सल कॅमेर्यासह नव्या स्मार्टफोनची झलक दाखवली आहे. हा फोन 24 मार्च रोजी मार्केटमध्ये डेब्यू करणार आहे. विशेष म्हणजे नेमक्या याच दिवशी वनप्लस 9 सिरीजदेखील लाँच होणार आहे. (Realme 108MP camera smartphone confirmed to launch on March 24)
टीझर व्हिडिओमध्ये ग्रेटर नोएडामधील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट दाखविण्यात आलं आहे. या टीझर व्हिडिओमध्ये रियलमीचे सीईओ माधव सेठ स्पोर्ट्स कार चालवताना दिसत आहेत. 3 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये दोन स्पोर्ट्स कार्सची झलक दाखवण्यात आली आहे.
दोन्ही कार्सच्या मदतीने इन्फिनिटी डिझाइन दर्शवण्याचा प्रयत्त केला आहे, जिथे कंपनीने 24 मार्च रोजी 108 मेगापिक्सल कॅमेर्यासह फोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. टीझरमध्ये असे लिहिले आहे की आम्ही 24 मार्च रोजी लाईव्ह येणार आहोत, तोपर्यंत आमच्यासोबत रहा.
टीझर व्हिडिओमध्ये फोनविषयी फारशी माहिती देण्यात आलेली नाही. परंतु याबाबत काही रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी 24 मार्च रोजी रियलमी 8 सिरीज लाँच करण्याची शक्यता आहे. या सिरीजमध्ये Realme 8 आणि Realme 8 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले जाण्याची शक्यता आहे. तसेच यामधील स्टँडर्ड मॉडेलमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे, तर याच्या प्रो मॉडेलमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो.
माधव सेठ यांनी काही दिवसांपूर्वी रियलमी 8 वर्जनच्या वॅनिला मॉडलबाबत पोस्ट केली होती. मिळालेल्या माहितीनुसार या फोनमध्ये 6.4 इंचांचा एमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो जी 95 चिपसेट, 5000mAH क्षमतेची बॅटरी आणि 30W चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.
कसा असेल रियलमी 8 प्रो?
रियलमी 8 प्रो दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, ज्यामध्ये 6 जीबी, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस दिली जाऊ शकते. त्याच वेळी, यूआय 2.0 आधारित Android 11 सह फोनमध्ये 4500mAh बॅटरी आणि 65 वॅट्स चार्जिंगची सुविधा दिली जाऊ शकते. कॅमेराच्या बाबतीत, या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो, जो सॅमसंग ISOCELL HM2 सेन्सरसह येईल.
WhatsApp मध्ये लवकरच जबरदस्त नवे फिचर्स; मल्टी डिव्हाईस सपोर्टसह Instagram Reels लुटता येणार आनंद!https://t.co/AoQyDqbTFR#whatsapp | #WhatsappPrivacy | #WhatsappStatus
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 13, 2021
इतर बातम्या
जगातला पहिला 18GB RAM वाला स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…
तीन महिन्यात भारतात 5G नेटवर्क सुरु होणार? 10 लाख नोकऱ्या मिळणार
OPPO चे दोन नवीन स्मार्टफोन F19 Pro+ 5G आणि F19 Pro लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
(Realme 108MP camera smartphone confirmed to launch on March 24)