Realme 9 pro आणि 9 pro Plus भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
रियलमीने (Realme) भारतात आपले दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोनची नावं रियलमी 9 प्रो (Realme 9 Pro) आणि रियलमी 9 प्रो प्लस (Realme 9 Pro Plus) अशी आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह येतात.
मुंबई : रियलमीने (Realme) भारतात आपले दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोनची नावं रियलमी 9 प्रो (Realme 9 Pro) आणि रियलमी 9 प्रो प्लस (Realme 9 Pro Plus) अशी आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह येतात. ही सिरीज Realme 8 Pro सिरीजचं अपग्रेडेड व्हर्जन आहे, जी कंपनीने गेल्या वर्षी 108 मेगापिक्सेल कॅमेरासह लॉन्च केली होती. हा फोन स्लिम डिझाईनसह येतो. Realme 9 Pro Plus ची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये इतकी आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. Realme 9 Pro तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. सुरुवातीच्या वेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे, ज्यामध्ये 6 GB रॅम + 128 GB इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. दुसऱ्या वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे, ज्यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. तिसरं आणि टॉप व्हेरिएंट 28,999 रुपयांना येतं, जे 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आलं आहे.
Realme 9 pro Plus चा कॅमेरा
Realme 9 Pro Plus मध्ये फ्लॅगशिप लेव्हल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा आहे. यात 119 डिग्री सुपर वाईड कॅमेरा मिळेल, तर तिसरा मॅक्रो कॅमेरा आहे.
Realme 9 pro चे स्पेसिफिकेशन्स
या मोबाईल फोनमध्ये 120hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे, जो स्क्रोलिंग आणि गेमिंग अनुभव सुधारतो. तसेच या मोबाईलमध्ये Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच फोनचे तापमान सामान्य ठेवण्यासाठी लिक्विड कूलिंग सिस्टम उपलब्ध असेल. हा मोबाईल 5000 mAh बॅटरीसह येतो, जो 33W डार्ट चार्जरसह येतो.
Introducing the powerful #realme9Pro 5G! Get ready to be blown away by its Snapdragon 695 5G Processor, 64MP Nightscape Camera, and more!
Introductory price: ₹17,999. First Sale at 12 PM, 23rd Feb.#CaptureTheLight #realme9ProSeries 5G
Know more: https://t.co/rpathW3JQx pic.twitter.com/4Onh0zeMVf
— realme (@realmeIndia) February 16, 2022
Realme 9 pro चा कॅमेरा सेटअप
Realme 9 Pro बद्दल बोलायचे झाले तर यात 64 मेगापिक्सलचा नाईटस्केप कॅमेरा आहे. यात 4 सेमीचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच 119 डिग्री वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये स्मार्ट लाँग एक्सपोजर, 90 पॉप फिल्टर्स आणि पीक आणि झूम मोड देण्यात आले आहेत.
Flagship Camera in Mid-range has now arrived! Say hello to the #realme9Pro+ 5G, with a Light Shift Design, D920 5G Processor & more!
Starting at ₹24,999. First Sale at 12 PM, 21st February.#CaptureTheLight #realme9ProSeries 5G
Know more: https://t.co/s55s5wwLFr pic.twitter.com/bW36SZGHnB
— realme (@realmeIndia) February 16, 2022
इतर बातम्या
WhatsApp ओपन न करता पूर्ण मेसेज वाचा, मेसेज रीड केल्याचं समोरच्याला कळणारच नाही
एलॉन मस्कच्या ‘स्टारलिंक’ला टक्कर, Jio कडून सॅटेलाइटवर आधारित इंटरनेटची चाचपणी
WhatsApp मधले सीक्रेट फीचर्स माहित आहेत का? ॲप न उघडता अनेक कामं करता येणार