Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युनिक लूकसह Realme 9 Pro + चं Free Fire लिमिटेड एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

रियलमी (Realme) या चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने रियलमी 9 प्रो प्लस (Realme 9 Pro+) या स्मार्टफोनचा फ्री फायर लिमिटेड एडिशन (Free Fire Limited Edition) स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

युनिक लूकसह Realme 9 Pro + चं Free Fire लिमिटेड एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Realme 9 Pro Plus Free Fire Limited Edition Image Credit source: Realme
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 5:41 PM

मुंबई : रियलमी (Realme) या चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने रियलमी 9 प्रो प्लस (Realme 9 Pro+) या स्मार्टफोनचा फ्री फायर लिमिटेड एडिशन (Free Fire Limited Edition) स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन सध्या थायलंडमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनला अतिशय आकर्षक लूक देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या बॅक पॅनेलच्या वर एक रंगीत डिझाइन आहे जिथे Realme ब्रँडिंगच्या खाली फ्री फायर लिहिलेले आहे. तसेच, कॅमेरा मॉड्यूलच्या बाजूला, Booyah! टेक्स्ट आहे जी गेमिंगमधील एक लोकप्रिय फ्रेज आहे. या व्यतिरिक्त हा फोन Realme 9 Pro+ स्मार्टफोन प्रमाणेच स्पेसिफिकेशन्ससह येतो. स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा AMOLED डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 4,500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Realme 9 Pro+ Free Fire Limited Edition ची किंमत 8GB RAM आणि 128GB स्टोरेज कॉन्फिगरेशन असलेल्या व्हेरिएंटसाठी 12,499 THB आहे. ही किंमत भारतात 28,200 रुपये इतकी असेल. स्मार्टफोन आता थायलंडमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि लिस्टिंगनुसार 10 दिवसात या फोनची शिपिंग सुरू होईल. Realme दक्षिण आशियाई देशात Realme 9 Pro+ स्मार्टफोनचे नियमित व्हेरिएंट देखील विकत आहे.

Realme 9 Pro+ फ्री फायर लिमिटेड एडिशनचे स्पेसिफिकेशन्स

फोनच्या बॅक पॅनलवरील प्रमुख डिझाइन बदलांव्यतिरिक्त, Realme 9 Pro+ Free Fire Limited Edition आणि Realme 9 Pro+ नियमित स्मार्टफोनमध्ये कोणताही फरक नाही. यात 20:9 आस्पेक्ट रेश्यो, 90Hz रिफ्रेश रेट आणि 2.5D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह 6.4 इंचांचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सेल) सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन MediaTek Dimensity 920 SoC सह सुसज्ज आहे, जो 8GB LPDDR4X RAM सह जोडलेला आहे.

फोटोग्राफीसाठी, Realme 9 Pro+ Free Fire Limited Edition मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) सपोर्टसह 50 मेगापिक्सेलचा Sony IMX766 प्रायमरी सेन्सर आहे. यात 8 मेगापिक्सलचा Sony IMX355 कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो शूटर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. यात 128GB UFS 2.2 इनबिल्ट स्टोरेज आहे. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आहे जी 60W सुपरडार्ट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.

इतर बातम्या

‘व्हॉट्सअ‍ॅप’चं नवीन फीचर खूपच भारी! इमेज पाठवताना आता युजर्स अनुभवणार नवा बदल

5000 mAh बॅटरी, 50MP कॅमेरासह Motorola चा नवीन फोन भारतात लाँच, किंमत 9999 रुपयांपासून…

Budget Gaming Phone: 12 हजार रुपयांच्या रेंजमध्ये टॉप 4 स्मार्टफोन्स, यादीत Redmi ते Moto चे पर्याय

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.