Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

या फोनच्या डिस्प्लेमध्ये 1.07 बिलियन रंग आहेत आणि HDR10+ सर्टिफिकेशनला सपोर्ट करतात. याव्यतिरिक्त, स्क्रीन डीसी डिमिंगला सपोर्ट करते. त्यात चिप-बाय-चिप कॅलिब्रेशन आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Realme GT Neo3
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 12:04 PM

मुंबई : रियलमी (Realme) ही चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी आज जीटी निओ 3 (GT Neo 3) हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. पुढील तासाभरात हा फोन बाजारात एंट्री घेईल. लॉन्चिंगच्या अगोदर, कंपनीने फोनचे काही डीटेल्स जाहीर केले आहेत. Realme ने आता Realme GT Neo 3 चे डिस्प्ले स्पेक्स शेअर केले आहेत. त्यानुसार GT Neo 3 च्या डिस्प्लेची किंमत जुन्या मॉडेलपेक्षा (GT Neo 2) खूप जास्त असेल. GT Neo 3 चा डिस्प्ले अल्ट्रा नॅरो बेझेल डिस्प्ले आणि नवीन कलर अपडेट्ससह येईल. स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये 2.37mm अल्ट्रा-नॅरो चिन आणि 1.48 mm सुपर-थिन बेझल्स आहेत. स्क्रीनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 94.2% असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जो जुन्या मॉडेलच्या स्क्रीनच्या 85.7% स्क्रीन-टू-बॉडी रेशोपेक्षा खूप जास्त आहे. याशिवाय, यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000Hz “गेमिंग कंट्रोल इंजिन” असलेली फ्लेक्सिबल स्ट्रेट स्क्रीन आहे. हा फोन सध्या चिनी बाजारात लाँच केला जाणार आहे. भारतात हा स्मार्टफोन कधी लाँच केला जाईल, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

डिस्प्लेमध्ये 1.07 बिलियन रंग आहेत आणि HDR10+ सर्टिफिकेशनला सपोर्ट करतात. याव्यतिरिक्त, स्क्रीन डीसी डिमिंगला सपोर्ट करते. त्यात चिप-बाय-चिप कॅलिब्रेशन आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. Realme GT Neo 3 च्या स्पेक्स शीटमध्ये बरेच नवीन फीचर्स आहेत. या स्मार्टफोनमध्ये फुल-एचडी+ रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल. यात पंच-होल पॅनेल असेल.

Realme GT Neo3 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

डिव्हाइस MediaTek Dimensity 8100 SoC सह सुसज्ज असेल आणि त्यात इंडिपेंडेंट डिस्प्ले चिप असेल. स्मार्टफोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 इंटर्नल स्टोरेजसह सादर केला जाईल. फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, यात 50MP सोनी IMX766 प्रायमरी कॅमेरा सेन्सर असेल. सोबत 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सिस्टिम यात दिली जाईल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा दिला जाईल.

फास्ट चार्जर

या फोनमध्ये 150W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सपोर्टसह 4,500mAh क्षमतेची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. Realme ने पुष्टी केली आहे की हा फोन फक्त 5 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 0% ते 50% पर्यंत चार्ज होईल. फोन आउट ऑफ द बॉक्स Android 12 OS वर बूट होईल आणि वर Realme UI सपोर्ट असेल.

इतर बातम्या

100 हून अधिक वॉच फेसेस, 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप, Truke Horizon Smartwatch बाजारात, किंमत…

Paytm Payments Bank भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला विकतेय? डेटा लीक्सच्या दाव्यांवर कंपनी म्हणते…

आधार-पॅन कार्ड लिंक करा, अन्यथा 10,000 रुपयांचा दंड, पाहा SMS द्वारे Aadhaar-Pan लिंक करण्याची सोपी पद्धत

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.