काय बोलता राव…! Realme GT3 अवघ्या 9 मिनिटं आणि 30 सेकंदात होणार फुल चार्ज, काय आहे खासियत जाणून घ्या
रियलमीनं मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2023 मध्ये जीटी3 स्मार्टफोन सादर केला. या फोनची खासियत ऐकूनच भल्याभल्या कंपन्यांची झोप उडाली आहे. कारण इतक्या वेगाने चार्जिंग होणारा पहिला स्मार्टफोन आहे.
मुंबई : तंत्रज्ञानाचं युग स्मार्टफोनशिवाय अधुरं आहे. तशीच स्थिती आपण आसपास पाहतो. तुम्हाला प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळेल. म्हणजेच स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असंच म्हणावं लागेल. तुम्हाला स्मार्टफोन वापरताना एक बाब सर्वात जास्त खटकते ती म्हणजे चार्जिंगची..सोशल मीडियावर सर्फिंग करताना किंवा गेम खेळताना बॅटरी लो झाली की संताप होतो. बॅटरी चार्जिंगला लागणारा वेळ हे त्यामागचं खरं कारण असतं. पण रियलमीच्या जीटी3 स्मार्टफोनबाबत वाचलं तर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. रियलमी कंपनीनं नुकताच बार्सेलोनामधील मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2023 मध्ये हा फोन सादर केला आहे.
जलदगतीने चार्ज होणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. हा स्मार्टफोन 240 वॅट चार्जिंग पोर्टला सपोर्ट करतो. कंपनीच्या मते, रियलमी जीटी सीरिज नव्या तंत्रज्ञानाची झलक दाखवते. रियमी जीटी 3 चं सादरीकरण चीनमध्ये रियलमी जीटी निओ 5 लाँच केल्यानंतर केलं आहे.हा फोन दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आणि त्यापैकी एक 240 वॅट चार्जिंगला सपोर्ट करणारा आहे.
#realmeGT3 scripts history at #MWC23!#SpeedtotheMax pic.twitter.com/ZOvKFrdvSR
— Madhav Sheth (@MadhavSheth1) March 1, 2023
काय आहे खासियत
रियलमी जीटी3 मध्ये सर्वांचं लक्ष वेधलं ते वेगाने होणाऱ्या चार्जिंगने. जगातील सर्वात वेगाने चार्ज होणारा हा स्मार्टफोन असून अवघ्या 80 सेकंदात 20 टक्के चार्ज होतो. तर पूर्ण चार्ज होण्यासाठी 9 मिनिटं आणि 30 सेकंदाचा वेळ घेतो. या स्मार्टफोनमध्ये 4600 एमएएच बॅटरी आहे.
realme GT3 Global Launch Event | Speed to the Max https://t.co/0cGd4NBHku
— realme (@realmeglobal) February 28, 2023
रियलमी जीटी3 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जनरेशन 1 चिपसेट आहे. तसेच 16 जीबी रॅम स्टेनलेस स्टील वॅपर कुलिंग सिस्टम मॅक्स 2.0 शी जोडलेला आहे.या स्मार्टफोनची स्क्रिन 6.7 इंचाची असून 1.5 के अमोलेड डिस्प्ले आहे. या स्क्रिनचा रिफ्रेश रेट 144 एचझेड इतका आहे.
रियलमी जीटी3 स्मार्टफोनमध्ये बॅक साईटला 3 कॅमेरा सेटअप आहे. प्रायमरी कॅमेरा 50 एमपी, दुसरा कॅमेरा 8 एमपी अल्ट्रावाईड आणि 2 एमपी मायक्रोस्कोप लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाटी 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे.
रियलमी जीटी3 8 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज, 12 जीबी रॅम+256 जीबी स्टोरेज, 16 जीबी रॅम+512 जीबी स्टोरेज आणि 16 जीबी रॅम+ 1 टीबी व्हेरियंटमध्ये मिळेल. हा स्मार्टफोन पल्स व्हाईट आणि बूस्टर ब्लॅकमध्ये या रंगात मिळेल. या स्मार्टफोनची किंमत ग्लोबल बाजारात 646 डॉलर (53,490 रुपये) इतकी आहे.