64 मेगापिक्सल कॅमेरा, फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांची ‘या’ फोनला सर्वाधिक पसंती
रिअलमीची डिझाइन आणि प्रोसेसर आकर्षक आणि अप्रतिम आहे. त्यासोबत कॅमेराही उत्तम आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे.
मुंबई : रिअल मीचा नवा स्मार्टफोन लाँच झाला आहे. जो फोटोग्राफरचा छंद असलेल्या युजर्ससाठी फायदेशीर ठरु शकतो. कारण या फोनमध्ये तब्बल 64 मेगापिक्सलचा कॅमेरा (Realme x2 pro launch) देण्यात आला आहे. realme X2 Pro असं या नव्या फोनचे (Realme x2 pro launch) नाव आहे. realme X2 Pro हा बजेट स्मार्टफोन म्हणून ओळखला जातो. हा फोन लाँच झाल्यापासून ग्राहाकांकडून मोठी पसंती मिळत आहे.
रिअलमीची डिझाइन आणि प्रोसेसर आकर्षक आणि अप्रतिम आहे. त्यासोबत कॅमेराही उत्तम आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये बॅकसाईडला चार कॅमेरे दिले आहेत. फोनमध्ये प्रायअरी सेंसर 64MP चा आहे. 13MP चा टेलीफोटो कॅमेरा सेंसर दिला आहे. याशिवाय वाईड-एंगल कॅमेरा सेंसर 8MP आणि डेप्थ सेंसर 2MP चा दिला आहे.
तुम्हाला जर फोटोग्राफीचा छंद असेल, तर realme X2 Pro स्मार्टफोन बेस्ट आहे. यामध्ये सेल्फीसाठीही नाइटस्केप मोड आहे. या स्मार्टफोनचा सेल्फी 16MP चा आहे. याशिवाय कमी प्रकाशात प्रायमरी कॅमेरातून क्लिक केलेले फोटो छान येतात. तसेच वाइड अँगल कॅमेराच्या मदतीने तुम्ही क्वॉलिटीचे फोटो क्लिक करु शकता. त्यासोबतच व्हिडीओही शूट करु शकता.
realme X2 Pro मध्ये पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 855+ चा वापर केला आहे. जे ऑक्टा-कोर क्वलकॉमचे सर्वात लेटेस्ट चिपसेट आहे. हे प्रोसेसर स्पीड आणि मल्टीटास्किंगची समस्या दूर करतात. यावर PUBG Mobile आणि Call of Duty: Mobile सारखे मोठ्या साईजचे गेम चालतात.
realme X2 Pro चे डिझाईनमध्ये अॅल्युमिनिअम बॉडीसह फ्रंट आणि बॅकवर प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लास 5 चा वापर केला आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर ग्लॉसी फिनिशिंग दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तसेच सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.
realme X2 Pro दोन नॅनो सिम आणि ड्युअल 4G VoLTE सपोर्ट आहे. हा स्मार्टफोन Android 9 वर आधारित आहे.