48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत…

Realme Narzo 30 या सिरीजअंतर्गत रियलमी कंपनीने आज तिसरा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme Narzo 30 असं या स्मार्टफोनचं नाव आहे.

48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत...
Realme Narzo 30
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 3:51 PM

मुंबई : Realme Narzo 30 या सिरीजअंतर्गत रियलमी कंपनीने आज तिसरा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme Narzo 30 असं या स्मार्टफोनचं नाव आहे. या सिरीजमधील Realme Narzo 30 Pro 5G हा स्मार्टफोन एक टॉप एंड फोन आहे, तर Realme Narzo 30A हा स्मार्टफोन या सिरीजमधील बेस व्हेरिएंट आहे. कंपनीने या दोन स्मार्टफोन्समध्ये संतुलन साधण्यासाठी तिसरा फोन लाँच केला आहे. (Realme Narzo 30 launched with 5000mAh battery, MediaTek Helio G95 chipset, know price-features)

या नव्या Realme Narzo 30 स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलियो G95 चिपसेट देण्यात आला आहे. असाच चिपसेट शाओमीच्या लेटेस्ट रेडमी नोट 10S मध्येही वापरला गेला आहे. सध्या कंपनीने हा फोन मलेशियन मार्केटमध्ये लाँच केला आहे. रिअलमी सध्या मलेशियन बाजारावर जास्त लक्ष केंद्रित करीत आहे, कारण कोरोनामुळे भारतात कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. रियलमी नार्झो 30 हा स्मार्टफोन भारतात देखील लाँच केला जाणार आहे. परंतु भारतातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच ते शक्य होणार आहे.

किंमत

Realme Narzo 30 या स्मार्टफोनची किंमत 14,200 रुपये इतकी आहे, जिथे आपल्याला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळते. तथापि, पहिल्या सेलमध्ये हा फोन विकत घेणाऱ्या ग्राहकांना हा फोन 12,400 रुपये किंमतीत मिळणार आहे. हा फोन रेसिंग ब्लू आणि रेसिंग कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

फीचर्स

फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉयड 11 बेस्ड रियलमी UI 2.0 वर काम करतो. फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्जच्या रीफ्रेश रेटसह सादर करण्यात आला आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो 90.5 टक्के इतका आहे. फोनमध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलिओ जी 95 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे.

दमदार कॅमेरा

या फोनच्या कॅमेर्‍याविषयी सांगायचे तर फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाइट कॅमेरा, आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. फोन 4K 30fps ला सपोर्ट करतो. फोनमध्ये सुपर नाईटस्केप, अल्ट्रा 48 मेगापिक्सल मोड, पॅनोरामा, पोर्ट्रेट मोड, टाइम लॅप्स फोटोग्राफी, HDR, अल्ट्रा मॅक्रो, एआय सीन आणि इतर दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

5000mAh क्षमतेची बॅटरी

या फोनच्या बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Narzo 30A सह Realme चा सर्वात स्वस्त 5G फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Realme च्या ‘या’ 5G स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, 5000mAh बॅटरी, 8GB/128GB सह ढासू फीचर्स

Realme चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच, 5000mAh ची बॅटरी आणि हायटेक फीचर्स मिळणार

(Realme Narzo 30 launched with 5000mAh battery, MediaTek Helio G95 chipset, know price-features)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.