Narzo 30A सह Realme चा सर्वात स्वस्त 5G फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Realme कंपनीने भारतात दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Narzo 30 Pro आणि Narzo 30A अशी या स्मार्टफोन्सची नावं आहेत.

Narzo 30A सह Realme चा सर्वात स्वस्त 5G फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Realme Narzo
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 4:02 PM

मुंबई : रियलमी (Realme) कंपनीने भारतात दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने नार्झो 30 प्रो (Narzo 30 Pro) आणि नार्झो 30 ए (Narzo 30A) लाँच केले आहेत. Narzo 30 प्रो हा भारतातील सर्वात स्वस्त 5 जी फोन आहे. या स्मार्टफोनची किंमत रियलमी एक्स 7 आणि शाओमी एम आय 10 आयपेक्षा (Mi 10i) कमी आहे. Narzo 30 प्रो मध्ये 65W डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला नाही. तर Narzo 30 ए हा 4 जी फोन आहे जो 6000 एमएएच बॅटरीसह येतो. रियलमी Narzo 30 प्रो दोन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. याच्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे, तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजवाल्या स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये आहे. हा फोन स्वोर्ड ब्लॅक आणि ब्लेड सिल्व्हर कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे. (Realme Narzo 30 Pro launched as cheapest 5G phone in India alongside Narzo 30A)

फ्लिपकार्ट आणि रियलमी ऑनलाइन स्टोअरमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. रियलमी अपग्रेड प्रोग्राम अंतर्गत हा फोन 11,899 आणि 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. Narzo 30 ए बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेलं मॉडल सादर करण्यात आलं आहे या मॉडलची किंमत 8,999 रुपये इतकी आहे, तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजवाल्या मॉडलची किंमत 9,999 रुपये इतकी आहे. फोन लेझर ब्लू आणि लेझर ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनचा पहिला सेल 5 मार्चपासून फ्लिपकार्ट आणि रियलमी ऑनलाइन स्टोअरमध्ये सुरू होईल.

Realme Narzo 30 Pro चे फीचर्स

Realme Narzo 30 प्रो 5 जी कनेक्टिव्हिटी आणि 120 हर्ट्ज स्क्रीनसह सुसज्ज आहे. 5 जी साठी Narzo 30 प्रो मध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक डायमेन्शन 800 यू प्रोसेसर देण्यात आला आहे जो रियलमी एक्स 7 5जी मध्ये आहे. प्रोसेसरमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस आहे. हा स्मार्टफोन मायक्रो एसडी कार्ड सपोर्टसह सुसज्ज आहे. रियलमी Narzo 30 प्रो मध्ये 6.5 इंचाची एलसीडी स्क्रीन आहे जी 1080p रेजोल्यूशनसह येते. फोनमध्ये 405 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी आणि 600 पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे.

या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे, तर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेरामध्ये आपणास 48 मेगापिक्सल मोड, सुपर नाईटस्केप मोड, नाईट फिल्टर्स, क्रोमा बूस्ट, पॅनारॉमिक व्यू, एक्सपर्ट, टाइमलॅप्स, एचडीआर, अल्ट्रा वाइड, अल्ट्रा मॅक्रो आणि अन्य वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

फोनची बॅटरी 5000mAh क्षमतेची आहे जी 30 डार्ट फास्ट चार्जिंगसह येते. फोनमध्ये साइड माउंट केलेला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा फोन डॉल्बी एट्मॉस, Hi- Res ऑडिओ तंत्रज्ञानासह सादर करण्यात आला आहे.

Narzo 30A चे फीचर्स

Narzo 30 ए बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 6.54 इंच 720p एलसीडी स्क्रीन आणि 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 88.7 टक्के आहे. यामध्ये तुम्हाला मीडियाटेक हीलिओ जी 85 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह येतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने आपण ही मेमरी 256 जीबी पर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोन 6000mAh बॅटरीसह येतो. हा फोन 18 डब्ल्यू फास्ट चार्जिंग आणि यूएसबी पोर्ट टाइप सीला सपोर्ट करतो. फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

इतर बातम्या

जबरदस्त फीचर्ससह Huawei चा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, भारतात सेल कधी?

6000mAh बॅटरी, 48MP ट्रिपल कॅमेरा, कॅशबॅक ऑफरसह POCO M3 खरेदी करा

ट्रिपल कॅमेरासह Redmi 9 Power चं 6GB रॅम वेरिएंट भारतात लाँच, किंमत…

Motorola चा फोल्डेबल फोन 50 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या कुठून खरेदी करता येईल

(Realme Narzo 30 Pro launched as cheapest 5G phone in India alongside Narzo 30A)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.