Realme च्या ‘या’ 5G स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, 5000mAh बॅटरी, 8GB/128GB सह ढासू फीचर्स
रियलमी कंपनीने (Realme) आपल्या लोकप्रिय स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. रियलमी 8 (Realme 8) असे या स्मार्टफोनचे नाव आहे
मुंबई : रियलमी कंपनीने (Realme) आपल्या लोकप्रिय स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. रियलमी 8 (Realme 8) असे या स्मार्टफोनचे नाव आहे. हा रियलमीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. त्यामुळे आता तुम्ही हा सर्वात स्वस्त 5G फोन आणखी कमी किंमतीत खरेदी करु शकता. या फोनसाठी ग्राहकांना 500 रुपये कमी मोजावे लागतील. (Realme reduces Realme 8 5G price, check new rate)
रियलमी कंपनीने हा फोन रियलमी 8 प्रो सह गेल्या महिन्यात लाँच केला होता. रियलमी 8 या स्मार्टफोनचं सुरुवातीला 4 जी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलं होतं, त्यानंतर कंपनीने या फोनचे 5 जी व्हेरिएंटसुद्धा लाँच केले. दरम्यान कंपनी या फोनच्या काही स्पेक्समध्ये बदल केले आहेत. हा फोन 500 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. म्हणजेच, आता आपण हा फोन 14,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यात तुम्हाला फोनचं बेस व्हेरिएंट मिळेल. फोनचे दोन्ही व्हेरिएंट कमी किंमतीत उपलब्ध आहेत. या सवलतीसह फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही कूपन कोडची गरज भासणार नाही.
हा स्मार्टफोन 128 जीबी पर्यंतच्या ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो आणि यात डायनॅमिक रॅम एक्सपेंशन (डीआरई) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे जो बिल्ट-इन स्टोरेजला व्हर्च्युअल रॅममध्ये रूपांतरित करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. Realme चा हा फोन 90Hz डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे आणि त्यात ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्शन 700 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा तसेच एक होल-पंच डिस्प्ले आहे. हा फोन सायबर सिल्व्हर आणि सायबर ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.
Realme 8 5G के स्पेसिफिकेशन्स
- ड्युअल-सिम (नॅनो) Realme 8 5G Android 11 वर Realme UI 2.0 वर चालतो आणि त्यात 90Hz रीफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा फुल-एचडी + (1,080 × 2,400 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे.
- फोनमध्ये डीआरई तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे जो स्मूद मल्टीटास्किंगसाठी बिल्ट-इन स्टोरेजला व्हर्च्युअल रॅममध्ये रूपांतरित करतो.
- स्मार्टफोनमध्ये एफ / 1.8 लेन्ससह 48 मेगापिक्सेल सॅमसंग GM1 प्रायमरी सेन्सर, एफ / 2.4 पोर्ट्रेट लेन्ससह 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आणि एफ / 2.4 मॅक्रो लेन्ससह 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
- रियर कॅमेरा सेटअपला नाईटस्केप, 48M मोड, प्रो मोड, AI स्कॅन आणि सुपर मॅक्रोसारखे फीचर्स जोडलेले आहेत.
- सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी या Realme 8 5G फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. ज्यामध्ये f / 2.1 लेन्सचा वापर करण्यात आला आहे. या फ्रंट कॅमेरामध्ये पोर्ट्रेट, नाइटस्केप आणि टाइमलॅप्स फीचर देण्यात आलं आहे.
इतर बातम्या
22 हजारांचा फोन 6,999 रुपयांत, 16 हजारांचा फोन 8 हजारात, OPPO ची ढासू ऑफर
अवघ्या 1 रुपयात OPPO Band खरेदीची संधी, स्मार्टफोन्सवर 80% डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर?
(Realme reduces Realme 8 5G price, check new rate)