Realme U1 स्मार्टफोन रेडमी नोट 6 प्रो ला टक्कर देणार?
मुंबई: भारतात Realme U1 हा स्मार्टफोन पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन 28 नोव्हेंबरला लाँच होईल आणि अमेझॉन या शॉपिंग वेबसाईटवर तो एक्स्क्लुझिव्ह उपलब्ध असेल. लवकरच आम्ही U सीरीजचे स्मार्टफोन लाँच करणार आहोत, असं रिअल मी या कंपनीने मागील आठवड्यातच सांगितलं होतं. त्यानुसार कंपनीने आज या फोनची लाँचिंगची तारीख जाहीर केली. रिअलमी U1पहिलाच स्मार्टफोन […]
मुंबई: भारतात Realme U1 हा स्मार्टफोन पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन 28 नोव्हेंबरला लाँच होईल आणि अमेझॉन या शॉपिंग वेबसाईटवर तो एक्स्क्लुझिव्ह उपलब्ध असेल. लवकरच आम्ही U सीरीजचे स्मार्टफोन लाँच करणार आहोत, असं रिअल मी या कंपनीने मागील आठवड्यातच सांगितलं होतं. त्यानुसार कंपनीने आज या फोनची लाँचिंगची तारीख जाहीर केली.
रिअलमी U1पहिलाच स्मार्टफोन असेल ज्यात मीडियाटेक हिलियो पी70 प्रोसेसर सोबत असेल. फोनच्या फीचर्सबद्दल कंपनीने अजून माहिती दिलेली नाही. मात्र त्याच्या फीचर्सची माहिती ऑनलाईन पोर्टलवर आली आहे.
रिअलमी U1 फोनमध्ये सेल्फी सेंट्रिक कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये सगळ्यात पावरफुल सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून, फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि प्रीमीयम डिझाईन आहे, अशी माहिती अॅमेझॉन इंडियाच्या लिस्टिंग पेजवर देण्यात आली आहे.
Be prepared for the world’s first #MediaTekHelioP70 smartphone and an unmatchable selfie experience! Welcome #IndiasSelfiePro #RealmU1. Launch event live starts from 12:30 PM, Nov 28. Tag that person who’s crazy about selfie. ? pic.twitter.com/VnD8nWnzcC
— Realme (@realmemobiles) November 20, 2018
फोन लाँचिंग होण्याबाबतचा अलर्ट तुम्हाला हवा असेल, तर त्यासाठी तुम्हाला अॅमेझॉनवर जाऊन युजर्स नोटीफाय पेजवर क्लिक करावं लागेल. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाँचिंग होणाऱ्या फोनबाबतचे अलर्ट मिळतील.
या ब्रँडने आतापर्यंत पाच महिन्यांत 10 लाख स्मार्टफोन विकले आहेत. या फोनची तुलना रेडमी नोट 6 प्रोसोबत केली जात आहे. रेडमी नोट 6 प्रो हा फोन 22 नोव्हेंबरला बाजारात येत आहे. त्यामुळे हे दोन्ही फोन लाँच झाल्यानंतरच ग्राहकांनी कोणत्या फोनला पसंती दिली आहे, याची माहिती समजू शकेल.
रेडमी नोट 6 प्रो चे फीचर्स
रॅम – 4GB रॅम
मेमरी – 64GB
कॅमेरा – रिअर कॅमेरा (12+5), फ्रंट कॅमेरा (20+2)
बॅटरी – 4000mAh
प्रोसेसर – MIUI
स्क्रिन – 6.26 इंच, IPS LCD डिस्प्ले