Recharge Plan : एकदाच रिचार्ज करा आणि पूर्ण वर्षभर नो टेन्शन! सर्व कंपन्याचे स्वस्त आणि मस्त प्लान एका क्लिकवर
तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हाती आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. इतकंच काय तर ड्युअल सिमकार्डमुळे दोन नेटवर्क वापरणारे अनेक लोकं आहेत. त्यामुळे स्वस्त आणि मस्त प्लानच्या शोधात अनेक जण असतात.
मुंबई : प्रत्येकाच्या हाती आपल्याला मोबाईल फोन पाहायला मिळतो. आपल्या कुवतीनुसार प्रत्येक जण मोबाईल रिचार्ज करत असतो. जर तुम्हीही एक वर्षाची वॅलिडिटी असलेला रिचार्ज प्लान शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या रिचार्ज प्लानमुळे वर्षभराचं टेन्शन दूर होणार आहे. पाच रिचार्ज प्लानमुळे तुम्हाला वर्षभरासाठी फायदा होणार आहे. या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळतो. या व्यतिरिक्त ओटीटीचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं. आज आम्ही तुम्हाला एअरटेल, जिओ, बीएसएनएल आणि व्होडाफोन आयडिया कंपनीच्या रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला बचतीसोबत योग्य प्लान निवडण्यास मदत होणार आहे.
कंपन्या आणि त्यांचे वर्षभराचे रिचार्ज प्लान
Airtel : एअरटेल कंपनीचे देशभरात कोट्यवधी ग्राहक आहेत. चांगल्या नेटवर्कमुळे या कंपनीला ग्राहकांची पसंती मिळते. कंपनीने ग्राहकांसाठी वर्षाचे तीन प्लान सादर केले आहेत. या तिन्ही प्लानमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची मुदत मिळते. यात 3325 रुपयांचा एक प्लान आहे. यात दररोज 2.5 जीबीचा डेटा मिळतो. तसेच पूर्ण वर्षासाठी डिस्ने+हॉटस्टारचं फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
Jio : जिओ ही देखील भारतातील अग्रगण्य मोबाईल नेटवर्क कंपनी आहे. अल्पावधीतच कंपनीने आपली घट्ट मुळं बाजारात रोवली आहेत. जिओचा 2999 रुपयांचा प्लान आहे. या प्लान अंतर्गत 388 दिवसांची मुदत मिळते. तसेच 2.5 जीबीचा रोज डेटा मिळतो. अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात.
BSNL : बीएसएनएल 365 दिवसांचे दोन प्लान देते. यात अनलिमिडेट कॉलिंग आणि डेटा सुविधा मिळते. या प्लान अंतर्गत तुम्ही 3 जीबी पर्यंत डेटा वापरू शकता. या व्यतिरिक्त 100 एसएमएस सुविधा मिळते.
Vodafone Idea : व्होडाफोन आयडिया कंपनी युजर्संना 365 दिवसांची मुदत असलेले दोन रिचार्ज प्लान ऑफर करते. व्होडाफोनच्या 2999 रुपयांच्या प्लानमध्ये एकूण 850 जीबी डेटा बेनिफिट मिळेत. अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. दुसरा 365 दिवसांचा 3099 रुपयांचा प्लान दिवसाला 2 जीबी डेटा देतो. तसेच दररोज 100 एसएमएसची सुविधा आणि डिस्ने+हॉटस्टार फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.