VIDEO : फुग्याला बांधून स्मार्टफोन पाठवला, redmi note 7 ने आकाशातून फोटो टिपला

मुंबई : स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये आज मोठी स्पर्धा सुरु आहे. प्रत्येकजण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहे. चीनच्या शाओमी कंपनीनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हटके अशा पद्धतीने स्मार्टफोनचं प्रमोशन केलं आहे. नुकतेच कंपनीने रेडमी नोट 7 लाँच केला. या नव्या फोनचे प्रमोशन कंपनीने थेट अंतराळातून केलं आहे. शाओमीने ‘Out of the world’ स्मार्टफोन सिद्ध करण्यासाठी फोनचे […]

VIDEO : फुग्याला बांधून स्मार्टफोन पाठवला, redmi note 7 ने आकाशातून फोटो टिपला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये आज मोठी स्पर्धा सुरु आहे. प्रत्येकजण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहे. चीनच्या शाओमी कंपनीनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हटके अशा पद्धतीने स्मार्टफोनचं प्रमोशन केलं आहे. नुकतेच कंपनीने रेडमी नोट 7 लाँच केला. या नव्या फोनचे प्रमोशन कंपनीने थेट अंतराळातून केलं आहे.

शाओमीने ‘Out of the world’ स्मार्टफोन सिद्ध करण्यासाठी फोनचे प्रमोशन थेट अंतराळातून केले. कंपनीच्या यूरोप टीमने रेडमी नोट 7 ला एका हायड्रोजन फुग्याच्या सहाय्याने 33 हजार 375 मीटर उंचीवर अंतराळात पाठवले. जिथे तापमान -58 अंश सेल्सिअस होते. अशा ठिकाणी फोन पाठवून फोनच्या माध्यमातून पृथ्वीचे फोटो क्लिक केले आहेत.

रेडमी नोट 7 च्या हटके अशा प्रमोशनमुळे सर्वत्र या फोनची चर्चा सुरु आहे. यामुळे रेडमी फोनला मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चीनच्या मायक्रो ब्लॉगिंग साईट Weibo वर शाओमीच्या सीईओने एक पोस्ट करत म्हटले, “रेड मी नोट 7 ने अंतराळातून पृथ्वीचा फोटो घेतला आहे. तसेच फोन जेव्हा खाली परतला तेव्हा तो व्यवस्थित कामही करत होता.”

रेडमी नोट 7 लाँच होण्या आधीच कंपनीने फोनला हाय क्वॉलिटी फोन म्हणून प्रमोट केले होते.  रेडमी नोट 7 बजेट फोन आहे. तसेच कंपनीने फोनवर 18 महिन्यांची गॅरंटी दिली आहे.

फीचर

भारतात रेडमी नोट 7 यावर्षी फेब्रुवारी महिन्यात लाँच झाला होता. 3 जीबी, 4 जीबी, 6 जीबी रॅमसोबत 32 जीबी आणि 64 जीबी स्टोअरेज व्हेरिअंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. 6.3 इंचाचा डिस्प्ले फोनमध्ये दिला आहे.

रेडमी नोट 7 मध्ये 48+5 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तसेच 4,000mAh बॅटरी आहे.

व्हिडीओ : 

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.