Redmi 14c 5G पासून OnePlus 13R पर्यंत, जानेवारीत लाँच होणार ‘हे’ नवीन स्मार्टफोन

वनप्लस 13, वनप्लस 13 आर, रेडमी 14 सी 5 जी सह अनेक नवीनस्मार्टफोन्स जानेवारीमध्ये भारतीय बाजारात लाँच होणार आहेत. लाँचिंगपूर्वी या स्मार्टफोन्समध्ये आढळणाऱ्या काही खास फीचर्सची माहिती देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया लाँचिंगनंतर तुम्ही हे स्मार्टफोन कुठे खरेदी करू शकाल?

Redmi 14c 5G पासून OnePlus 13R पर्यंत, जानेवारीत लाँच होणार 'हे' नवीन स्मार्टफोन
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 4:14 PM

आपल्या भारतीय बाजारपेठेत दरवर्षी नवीन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लाँच होत असतात. ज्याचे सेलिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. अशातच तुमचा जुना फोन खूप हँग होतोय बरेच वर्ष तोच फोन वापरताय किंवा तुम्हाला जुन्या मोबाईलचा कंटाळा आला असेल, ज्यामुळे आता नवीन फोन खरेदी करण्याचा प्लॅन आहे, तर थोडं थांबा. पुढील महिन्यात म्हणजे नव्या वर्षात भारतीय बाजारात तुमच्यासाठी अनेक नवे स्मार्टफोन धुमाकूळ घालण्यासाठी येत आहेत. २०२५ मध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहेत.

वनप्लस, रेडमी आणि रियलमी सारख्या मोठ्या कंपन्यांचे नवे स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. अधिकृत लाँचिंगपूर्वीच आगामी स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. ज्याने तुम्ही त्या स्मार्टफोन बद्दल जाणून घेऊ शकता. चला तर मग जाणून कोणते फोन जानेवारीत म्हणजे नवीन वर्षात लाँच केले जाणार आहे.

रेडमी 14 सी 5 जी लाँच डेट

रेडमी कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन रेडमी 14 सी 5 जी हा नवा 5जी स्मार्टफोन 6 जानेवारी 2025 रोजी भारतीय बाजारात ग्राहकांसाठी लाँच केला जाऊ शकतो. लाँचिंगनंतर रेडमी ब्रँडचा हा फोन शाओमीच्या अधिकृत साइट Mi.com व्यतिरिक्त फ्लिपकार्टवर ही विक्री केली जाईल.

रियलमी 14 प्रो सीरिज लाँच डेट

रियलमीची नवी सीरिज पुढील महिन्यात जानेवारीत लाँच होणार आहे, या सीरिजमध्ये रियलमी १४ प्रो आणि रियलमी १४ प्रो प्लस हे दोन नवे स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या फ्लिपकार्टवर ही सीरिज जानेवारीमध्ये लाँच करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे, मात्र लाँचिंगच्या तारखेबाबत नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

फ्लिपकार्टवर या फोनसाठी स्वतंत्र पेज तयार करण्यात आले असून, या सीरिजमध्ये कलर चेंजिंग डिझाइन, क्वाड कर्व्ह डिस्प्ले, १.५ के डिस्प्ले रिझोल्यूशन सारखे खास फीचर्स देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

वनप्लस १३ च्या लाँच डेट

वनप्लस 12 चे अपग्रेडेड व्हर्जन वनप्लस 13 हा स्मार्टफोन 7 जानेवारी 2025 रोजी भारतीय बाजारात ग्राहकांसाठी लाँच करण्यात येणार आहे. या आगामी फोनसाठी ॲमेझॉनवर स्वतंत्र मायक्रोसाइट तयार करण्यात आली असून, या फोनमध्ये एआय फीचर्स, स्नॅपड्रॅगन 8 एलिट मोबाइल प्लॅटफॉर्म प्रोसेसर, 6000 एमएएच बॅटरी सारखे दमदार फीचर्स मिळणार आहेत.

वनप्लस 13 आर लाँच डेट

वनप्लसचा आणखीन एक वनप्लस 13 आर हा स्मार्टफोन वनप्लस १३ सोबत ७ जानेवारीला भारतीय बाजारात लाँच होणार आहे. ॲमेझॉनवर या फोनसाठी तयार करण्यात आलेल्या मायक्रोसाइटने फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 प्रोसेसरचा वापर करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

तर या फोनमध्ये 6000 एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, याशिवाय वनप्लसच्या या अपकमिंग आणि लेटेस्ट फोनमध्ये तुम्हाला एआय फीचर्सचा सपोर्ट मिळेल.

मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.