50MP कॅमेऱ्यासह Redmi 14C ने बाजारात केली मोठी एन्ट्री, विवोला देणार टक्कर
रेडमीने नवीन वर्षात त्यांचा पहिला स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. यामुळे कंपनीने बाजारात बजेट सेगमेंटमध्ये आधीच अस्तित्वात असलेल्या स्मार्टफोनची धडधड वाढवली आहे. लेटेस्ट फोनमध्ये अनेक फीचर्स आणि कॅमेरा क्वालिटी आहे. जी आता विवो सारख्या फोनला टक्कर देणार आहे.
भारतीय बाजारपेठेत मोठं मोठ्या कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन लाँच करत असतात. अश्यातच 2025 या नवीन वर्षामध्ये रेडमीने त्यांचा पहिला स्मार्टफोन Redmi 14C बाजारात लाँच केला आहे. हा फोन त्यांच्या मागील मॉडेल Redmi १३ C पेक्षा खूप चांगला आहे. रेडमी कंपनीने नुकत्याच लाँच केलेला Redmi 14C हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 2 चिपसेटसह सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अनेक दमदार फीचर्स मिळत आहेत. या फोनमध्ये 5160mAh बॅटरी देण्यात आली आहे.
तर Redmi 14C या स्मार्टफोनमध्ये फोटो-व्हिडिओसाठी ५० मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आला आहे. तर रेडमी कंपनीचा हा फोन आधीच बाजारात असलेल्या विवोच्या Vivo T3x 5G स्मार्टफोनला कडवी टक्कर देणार आहे. विवोने यापूर्वीही त्यांच्या या फोनच्या किंमतीत 1000 रुपयांची कपात केली होती.
Redmi 14C व्हेरियंट आणि त्याची किंमत
रेडमी कंपनीने Redmi 14C हा स्मार्टफोन तीन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हॅनिला व्हेरियंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 10,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज पर्यायासह येणाऱ्या व्हेरियंटची किंमत 11,999 रुपये आहे.
या फोनची विक्री १० जानेवारीपासून सुरू होणार आहे. दरम्यान कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून तुम्ही या स्मार्टफोनची खरेदी करू शकता.
बॅटरी आणि कॅमेरा
Redmi 14C मध्ये तुम्हाला 5160mAh दमदार बॅटरी मिळत आहे. हा फोन 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यासोबत तुम्हाला 33Wचा चार्जरही मिळतो. ज्याद्वारे फोन फास्ट चार्ज करता येईल. तर या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, फोटो-व्हिडिओग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सुद्धा आहे. तर या फोनमध्ये ॲडव्हान्स एआय फीचर्सही उपलब्ध करण्यात आलेला आहे.
Vivo T3x 5G ची टक्कर Redmi 14C शी होणार
Redmi 14C 5G लाँचिंगच्या काही दिवस आधी विवोने त्यांच्या लोकप्रिय Vivo T3x 5G स्मार्टफोनची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. आता भारतात Vivo T3x 5G ची किंमत १,००० रुपयांनी कमी झाली असून या फोनची सुरुवातीची किंमत 12,499 रुपये इतकी आहे.
Vivo T3x हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जनरेशन 1 चिपसेटसह सुसज्ज आहे. या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येतो. फोटोग्राफी व्हिडिओसाठी फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमधील प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे.