मुंबई : Redmi Note 11T 5G स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. या मोबाइल फोनमध्ये पंच होल डिस्प्ले आणि बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन तीन कलर व्हेरिएंट आणि मीडियाटेक डायमेंशन 810 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. (Redmi Note 11T 5G sale live on amazon with introductory discount offer)
Redmi Note 11T 5G तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे, या फोनच्या पहिल्या व्हेरिएंटची किंमत 15999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. यात 6 GB रॅम आणि 64 GB इंटर्नल स्टोरेज स्पेस मिळेल. तर 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज स्टोरेज मॉडेलची किंमत 17999 रुपये इतकी आहे. तसेच, 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. हा मोबाईल फोन आजपासून (7 डिसेंबर) Amazon आणि Mi Store वर उपलब्ध होईल. इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत, हा फोन 14999 रुपये, 15999 रुपये आणि 17999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
Redmi Note 11T 5G मध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90hz इतका आहे, जो स्क्रोलिंग आणि गेमिंग एक्सपीरियन्स सुधारतो. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कंपनीने यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास वापरला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 810 6nm चिपसेट वापरण्यात आला आहे, जो 6nm वर प्रोसेस करतो.
Redmi Note 11T 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या फोनच्या बॅक पॅनलवर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, तर 8 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा यात मिळेल, जी एक अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Redmi Note 11T 5G स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येतो. यात 33W फास्ट चार्जर आहे, जो टाइप C USB पोर्टसह येतो. Redmi Note 11T 5G मोबाईल फोन Android 11 सह MIUI 12.5 वर काम करतो.
इतर बातम्या
Redmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत…
8GB/128GB, 50MP कॅमेरासह Vivo Y55s बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
(Redmi Note 11T 5G sale live on amazon with introductory discount offer)