PHOTO | फिटनेस प्रेमींसाठी लवकरच भारतात येतोय Redmi Smart Band pro.; मोठ्या डिस्प्लेसोबत आहेत आकर्षक फीचर्स !
रेडमी भारतात येणाऱ्या 9 फेब्रुवारीला एक नवीन स्मार्ट बँड घेऊन येणार आहे, ज्याचे नाव रेडमी स्मार्ट बँड प्रो असेल. या बँडबद्दलच्या लॉन्चिंगची माहिती कंपनीने आपल्या ऑफिशियल ट्विटर खात्यावरून दिलेली आहे.
-
-
या बँडमध्ये 110 फिटनेस मोड्सचा समावेश केला जाणार आहे, ज्यामध्ये 15 प्रोफेशनल मोड्स असतील. सोबतच या बँडमध्ये हार्ट रेट ट्रॅकिंग फीचर्ससुद्धा मिळणार आहे यामध्ये अल्वेज ऑन डिस्प्ले राहील, जो क्विक ग्लैंससोबत मिळेल.
-
-
या बँडमध्ये आपल्याला एक मोठी स्क्रिन मिळेल सोबतच यामध्ये एसपीओ 2 सेंसर मिळेल. जे आपल्या रक्तातील ऑक्सिजनची मात्रा मोजण्याचे काम करते. यात हार्ट रेट सेन्सर आणि ब्रेथ काउंटिंगसाठीसुद्धा काही फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यामध्ये कॅलरी बर्निंग आणि दुसरे अन्य फीचर्सदेखील आपल्याला पाहायला मिळतील.
-
-
रेडमी या स्मार्ट बँडला भारतात 9 फेब्रुवारी रोजी लॉन्च करेल आणि या दरम्यान रेडमी नोट 11 ( redmi note 11) चे मोबाईल फोनसुद्धा बाजारात येणार आहेत. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कंपनीद्वारे जे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्या पोस्टरमध्ये काही फीचर्स बद्दलची माहिती सुद्धा सांगण्यात आलेली आहे.
-
-
हा एक फिटनेस बँड असून चीनमध्ये आधीच गेल्या वर्षी या ब्रॅण्डचे लॉन्चिंग ऑक्टोबर महिन्यामध्ये केले होते. या बँडमध्ये 2.5 डी एमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे सोबतच यामध्ये टेमपर्ड ग्लासचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.
-
-
रेडमी भारतात येणाऱ्या दिवसांत आपला एक नवीन स्मार्ट बँड (smart band) घेऊन येणार आहे. ज्याचे नाव रेडमी स्मार्ट बँड प्रो(Redmi Smart Band Pro) असेल. या बँड बद्दल च्या लॉन्चिंगची माहिती कंपनीने आपल्या ऑफिशियल ट्विटर(Twitter) खात्यावरून दिलेली आहे.