Reliance Virtual AGM Live | ‘रिलायन्स’ची वर्चुअल सभा, मुकेश अंबानी कोणत्या घोषणा करणार?

रिलायन्स इंडस्ट्रीज आपली वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) प्रथमच ऑनलाईन आयोजित करत आहे.

Reliance Virtual AGM Live | 'रिलायन्स'ची वर्चुअल सभा, मुकेश अंबानी कोणत्या घोषणा करणार?
Follow us
| Updated on: Jul 15, 2020 | 10:59 AM

मुंबई : जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) वार्षिक सर्वसाधारण सभेत फेसबुकसारख्या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांशी भागीदारी वाढवण्याबाबत घोषणा करु शकतात. (Reliance Industries Limited First Virtual 43rd Annual General Meeting)

रिलायन्स इंडस्ट्रीज आपली वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) प्रथमच ऑनलाईन आयोजित करत आहे. या बैठकीत अंबानी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ या फ्लॅगशिप कंपनीत विस्तार करण्याबाबत कंपनीचे विचार भागधारकांनाही सांगतील.

‘सौदी अरामको’शी भागीदारी

अ‍ॅक्सिस कॅपिटलच्या मते, मुकेश अंबानी या बैठकीत ‘सौदी अरामको’शी भागीदारीबाबत अपडेट देऊ शकतात. सौदी अरामकोने रिलायन्सच्या तेल आणि केमिकल व्यवसायातील 20% भागभांडवल 15 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याची घोषणा केली आहे. बुधवारीच्या बैठकीत यासंदर्भात मोठी बातमी समोर येण्याची शक्यता आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

गेल्या बैठकीत मुकेश अंबानी यांनी भागधारकांना सांगितले होते, की ते 31 मार्च 2021 पर्यंत कंपनीला कर्जमुक्त (net-debt free) करण्याच्या दिशेने काम करतील. हे काम त्यांनी खूप आधीच पूर्ण केले आहे. जिओ प्लॅटफॉर्ममधील 25% पेक्षा जास्त भागभांडवल विकून त्यांनी सुमारे 1.18 लाख कोटींची मोठी गुंतवणूक जमा केली आहे.

याशिवाय कंपनीने ‘राइट्स इश्यू’द्वारे 53 हजार कोटी रुपये जमा केले आहेत. आतापर्यंत 13 गुंतवणूकदारांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. गुगलही जिओ प्लॅटफॉर्मवर 4 अब्ज डॉलर्स (सुमारे 30 हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा : मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी, वॉरने बफेंना मागे टाकलं

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 43 व्या एजीएममधून कोविड -19 नंतरची रणनीतिक दिशा आणि मालमत्तांचे मुद्रीकरण (Monetization of assets) याविषयी माहिती मिळेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. (Reliance Industries Limited First Virtual 43rd Annual General Meeting)

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.