Reliance Jio Prepaid Plan: जिओने लाँच केला भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीतला पहिला कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी प्लॅन

भारतातील दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) नुकताच एक नवीन प्रीपेड प्लॅन (Jio Prepaid Plan) ऑफर केला आहे. हा प्लॅन 'कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी' (Calendar Month Validity) या टॅगलाइनसह लॉन्च करण्यात आला आहे.

Reliance Jio Prepaid Plan: जिओने लाँच केला भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीतला पहिला कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी प्लॅन
Reliance-JioImage Credit source: File
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 2:19 PM

मुंबई : भारतातील दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) नुकताच एक नवीन प्रीपेड प्लॅन (Jio Prepaid Plan) ऑफर केला आहे. हा प्लॅन ‘कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी’ (Calendar Month Validity) या टॅगलाइनसह लॉन्च करण्यात आला आहे. त्याची किंमत 259 रुपये आहे. हा बजेट प्लॅन आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा एक अनोखा प्रीपेड प्लॅन आहे कारण ती युजर्सना एका कॅलेंडर महिन्यासाठी अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग फायदे मिळतात. म्हणजे पूर्ण 30 दिवस आणि 31 दिवसांची वैधता. Jio ने दावा केला आहे की संपूर्ण महिन्याच्या वैधतेसह प्लॅन सादर करणारी ही देशातील पहिली टेलिकॉम कंपनी आहे. या प्लॅनप्रमाणे, युजर्सना दररोज 1.5GB डेटा, 100 SMS/दिवस आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळते. वापरकर्त्यांना या प्लॅनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एका वर्षात रिचार्जची संख्या फक्त 12 असेल. तर यापूर्वी 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनमध्ये युजर्सना वर्षभरात 13 रिचार्ज करावे लागत होते.

यासह, प्लॅनमधील दैनिक डेटा संपल्यानंतर, डेटा स्पीड 64 Kbps पर्यंत खाली येतो. या व्यतिरिक्त, प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदे देखील आहेत ज्या अंतर्गत युजर्सना JioCinema, JioTV, JioCloud आणि JioSecurity सारख्या Jio अॅप्समध्ये फ्री अॅक्सेस मिळतो.

259 रुपयांच्या प्लॅनची खासियत

हा प्लॅन विशेषत: अशा युजर्ससाठी एक चांगला पर्याय आहे जे 30 किंवा 31 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला प्लॅन शोधत आहेत किंवा ज्यांना संपूर्ण महिन्यासाठी कंपनीच्या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. जिओच्या इतर प्रीपेड प्लॅनप्रमाणे, 259 रुपयांचा प्लॅन एकाच वेळी अनेक वेळा रिचार्ज केला जाऊ शकतो. हा प्लॅन सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलद्वारे नवीन आणि सध्याच्या युजर्ससाठी उपलब्ध आहे.

कंपनीचा एक प्लान आहे जो फक्त 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. ज्याची किंमत 239 रुपये आहे. या प्लॅनपेक्षा 20 रुपयांपेक्षा जास्त किमतीसह, आता कंपनी 259 रुपयांमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह नवीन प्लॅन ऑफर करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, दूरसंचार नियामक TRAI ने दूरसंचार कंपन्यांना 30 दिवसांच्या वैधतेसह प्रीपेड मोबाइल रिचार्ज प्लॅन प्रदान करण्यास सांगितले आहे. ज्याची आता अंमलबजावणी होताना दिसत आहे. यात आता इतर टेलिकॉम कंपन्या देखील असे प्लॅन्स सादर करु शकतात.

रिलायन्स जिओचा नवीन 555 रुपयांचा प्लॅन

यूजर्सकडून डेटाची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने या महिन्यात अनेक नवीन प्लॅन ऑफर केले आहेत. ज्यामध्ये 555 रुपयांचा नवा प्लॅनदेखील नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये 55 दिवसांसाठी 55 जीबी डेटा मिळतो. हा केवळ डेटा प्लॅन आहे ज्यामध्ये युजर्सना व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे मिळत नाहीत. पण, या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे यात OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.