Jio च्या या प्लॅनवर 2150 रुपयांचा फायदा, मुकेश अंबानी काही थांबेनात, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना गिफ्ट
Reliance Jio New Year Offer : Mukesh Ambani यांची टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने ग्राहकाला नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. युझर्ससाठी एक खास जिओ ऑफर आणण्यात आली आहे. या ऑफरमध्ये कंपनी ग्राहकांना 2150 रुपयांचा फायदा देत आहे.
तुमच्याकडे जिओ कंपनीचा क्रमांक आहे का? तर हे वृत्त तुमच्यासाठीच आहे. मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी Reliance Jio कडून ग्राहकांना नवीन वर्षात अजून एक जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे. नवीन वर्षात त्यांना हे गिफ्ट मिळेल. कंपनी फ्री गिफ्टनिमित्त जिओ युझर्सला 2150 रुपयांचा फायदा देत आहे. काय आहे ही ऑफर? प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा Jio New Year Offer 2025 चा फायदा यंदाही देण्यात येत आहे. 2025 रुपयांच्या प्लॅनवर रिलायन्स जिओ खास ऑफर घेऊन आली आहे. या रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना 2150 रुपयांचा फायदा होईल. काय आहे ही ऑफर, कसा होईल ग्राहकांना फायदा?
Jio 2025 Plan Details
हा प्लॅन ग्राहकांना दररोज 2.5 जीबी हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात येत आहे. 2025 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 200 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येईल. याशिवाय ग्राहकांना ट्रॅव्हल आणि फूड कूपन डिस्काऊंट व्हाऊचर्स पण मोफत देण्यात येणार आहे.
असा मिळेल 2150 रुपयांचा फायदा
2025 रुपयांचा प्लॅन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना रिलायन्स जिओकडून EasemyTrip चे व्हाऊचर मिळेल. फ्लाईट तिकीट बुकिंगसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. या व्हाऊचर आधारे तुम्ही फ्लाईट बुकिंगवर 1500 रुपयांपर्यंतच्या सवलतीचा फायदा घेऊ शकता.
Ajio कडून कपडे खरेदी केल्यास 2999 रुपयांच्या कमीत कमी शॉपिंगवर 500 रुपयांचे डिस्काऊंट मिळेल. याशिवाय स्विगीचे 150 रूपयांचे व्हाऊचर देण्यात येणार आहे. स्विगीवर हे कूपन रिडीम केल्यास 150 रुपयांचा फायदा होईल.
केव्हापर्यंत मिळेल फायदा
रिलायन्स जिओच्या या ऑफर फायदा ग्राहक 11 जानेवारी 2025 रोजीपर्यंत घेऊ शकता. म्हणजे ग्राहक येत्या 11 जानेवारीपर्यंत 2025 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन रिचार्ज करता येईल. त्यावर ग्राहकांना जवळपास 2150 रुपयांचा फायदा होईल.
601 रुपयांचा प्लॅन काय?
Jio ने अजून एक खास प्लॅन आणला आहे. 601 रुपयांचा प्लॅन खरेदीसाठी तुम्हाला 12 अपग्रेड व्हाऊचर मिळेल. ते तुम्ही एक-एक करुन रिडीम करू शकता. हे व्हाऊचर तुम्हाला माय जिओ ॲपवर दिसेल. व्हाऊचर रिडीम केल्यानंतर ग्राहकांना अनलिमिटेड 5जी डेटाचा फायदा घेता येईल. एका व्हाऊचरची व्हॅलिडिटी केवळ 30 दिवसांची आहे. जर एखाद्या बेस प्लॅनमध्ये व्हॅलिडिटी 28 दिवसांसाठी असेल तर व्हाऊचर सुद्धा 28 दिवसांसाठी सक्रिय राहील. त्यानंतर तुमचे दुसरे व्हाऊचर सक्रिय करता येईल.