Mobile Addiction : मुलं सतत मोबाईलला चिकटून राहतायत !, या आजारांचा धोका

पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याने त्याचा मुलगा 11 वर्षांचा असताना त्याला मोबाईल फोन का घेऊन दिला नाही ? याचा एक व्हिडीओ त्याने युट्युब खात्यावर नुकताच पोस्ट केला होता. आपल्या देशात तर मोबाईलची क्रांतीच आली आहे. लोक मोबाईलने इतके झपाटले आहेत की त्यापुढे त्यांना नाती आणि खरं प्रेम समजेनासं झालं आहे. मोबाईलने लहान मुलांच्या एकंदरच विकासावर कसा दुष्परिणाम होतो. त्यासंबंधीचा हा लेखाजोखा...

Mobile Addiction : मुलं सतत मोबाईलला चिकटून राहतायत !, या आजारांचा धोका
Mobile Addiction
Follow us
| Updated on: Aug 26, 2024 | 3:44 PM

स्क्रीन ॲडिक्शनचे प्रमाण वाढले आहे. मुलं सतत मोबाईल पाहण्यात मश्गुल झालेली असतात आणि पालकही ती रडू नयेत, खेळतायत म्हणून बिनधास्त त्यांच्याकडे आपला मोबाईल सुपूर्द करीत आहेत. यामुळे भारतीय मुलांचे स्क्रीन ॲडिक्शनचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या कारणांनी भारतीय मुलांचा स्क्रीन टाईम वाढला असून हे एक प्रकारचे व्यसन असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात सजग पालकांनी आणि आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञांनी हा धोका वेळीच ओळखा आणि मुलांना मैदानात खेळायला पाठवा असे म्हटले आहे. कारण जास्त वेळ मोबाईल पाहण्याने मुलांना मल्टीपल डिसऑर्डरचे आजार होऊ शकतात असे म्हटले जात आहे.

सायकॉलॉजिस्ट डॉ.एरीक सिग्मन यांनी जर्नल ऑफ दि इंटरनॅशनल चाईल्ड न्युरोलॉजी असोसिएशनमध्ये एक प्रबंध प्रकाशित केला होता. विविध प्रकारच्या स्क्रीन पाहण्यांचा मुलांच्या वाढत्या वेळेला ‘व्यसन’असे संबोधले जात आहे. स्वत:हून किंवा प्रॉब्लमॅटिक पद्धतीने विविध प्रकारच्या मोबाईल, टीव्ही,स्मार्ट वॉच, टॅब, लॅपटॉप, गेम, किंडल अशा विविध माध्यमातून स्क्रीन पाहण्यात गुंतलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारी ‘स्क्रीन ॲडिक्शन’ ही टर्म असल्याचे सिग्मन यांनी म्हटले आहे.

मुलांचा वाढता स्क्रीन टाईम आणि ब्रेन डिसऑर्डर

मोबाईल स्क्रीन पाहण्याचा सर्वात मोठा मेजर प्रॉब्लेम म्हणजे मुलांच्या खेळण्याची सवय हळूहळू लोप पावत चालली असून त्यांमध्ये मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ही एक प्रकारचे ओबेसिटी एपिडेमिक आहे. त्यामुळे ही मुले अकाली मोठी दिसत आहेत. वजन वाढल्याने आरोग्याचे चिंताजनक आजार वाढू लागले आहेत. भारतात एकीकडे टीनेएज म्हटल्या जाणाऱ्या तरुण पिढीचा मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेटवरील स्क्रीन टाईम वाढत चालल्याने दुसरीकडे कार्डिओवस्कुलर डिसिजचे प्रमाण वाढत चालले आहे. टाईप -2 डायबेटिक आणि इतर नॉन कम्युनिकेबल डिसिजचे प्रमाण वाढत चालले आहे.

न्यूरल डेव्हलपमेंट थांबू शकते

या फिजिकल आणि मेंटल हेल्थ आव्हानांमुळे तीव्र परिणाम दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होण्यात झालेले असून ते प्रौढत्वापर्यंत टिकून राहण्याची शक्यता बळावत चालली आहे. मोठ्या माणसांमध्ये मेंदूचा विकास आधीच झालेला असल्याने त्यांच्यावर या स्क्रीन टाईम वाढल्याचा तितकासा प्रभाव पडत नाही, परंतू लहान मुलांच्या मोबाईल स्क्रीन सतत पाहण्याने त्यांच्या मेंदूच्या विकासावर देखील मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे लहान मुलांचे स्वतंत्र विचार करण्याची शक्ती हरवून बसतात आणि त्यांचे स्क्रीन अवलंबित्व वाढत जाते. स्क्रीन पाहत राहिल्यामुळे त्यांची न्यूरल डेव्हलपमेंट थांबू शकते.

ज्ञानेंद्रियांचा विकास मंदावतो

या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या प्रबंधात अति स्क्रीन टाईम वाढल्याने पाच वर्षांखालील मुलांच्या मेंदू आणि ज्ञानेंद्रियांचा विकास मंदावल्याचे पुढे आले आहे. वाढलेल्या स्क्रीनच्या टाईममुळे लहान मुलांचा विकास उशीराने होतोय , विशेषतः भाषा शिकणे आणि संवाद साधण्याच्या क्षेत्रात, विशेषत: 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये वागणूकीत लक्षणीयरीत्या बदल झाल्याचे संशोधनात उघडकीस आले आहे. स्क्रीन टाईम वाढण्याचा थेट या डिसऑर्डरशी संबंध नाही. परंतू हे नक्की की हे अधिक मुलांना न्यूरो डेव्हलपमेंटल विकारांमध्ये ढकलत आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुले केवळ नक्कल करायला शिकतात

अनेक सात ते आठ वर्षांची मुले डोळ्यांचे विकारग्रस्त झाली आहेत, त्यांना आय कॉन्टॅक्ट करता येत नाही. एका ठिकाणी नजर एकाग्र करता येत नाही. त्यांचे निदान ऑटिझममध्ये केले जात आहे. त्यांना फळ्यावरील लिहीलेले दिसत नाही. किंवा गणित सोडविणे किंवा आणि इतर अभ्यास अवघड वाटत आहे. ज्याचा संबंध स्क्रीनच्या व्यसनाशी अप्रत्यक्षपणे जोडला जात आहे. मूले त्यांचे उच्चार बदलून स्क्रीनवर जे पाहतात त्याचीच नक्कल करण्यास सुरुवात करतात. 3 वर्षांखालील मुलांसाठी जास्त वेळ स्क्रीन पाहण्याच्या हा परिणाम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

डोळ्यांना जपण्यासाठी स्क्रीन टाईम कमी करा

पालिका आरोग्य खात्याने केलेल्या एका अभ्यासात जी मुले जास्त वेळ स्क्रीन पाहातात त्यांना Myopia हा आजार होतो. त्यांचे डोळ्यांचे आरोग्य बिघडते. जास्त वेळ जर या आजाराची स्थिती राहीली तर रेटिनल डीएटेचमेंट, ग्लुकोमा आणि मक्युलर डिजनरेशन इत्यादी डोळ्यांचे विकार होतात. मेंदूतील दृष्टी केंद्रांवरील हा ताण शिकण्याचा आणि वेगाने विचार करण्याच्या विकासावर परिणाम करू शकतो, कारण मेंदूद्वारे माहितीचे वेगाने निदान करण्यासाठी आधी आपल्या स्पष्ट दिसणे महत्त्वाचे असते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य जपायचे असेल तर आपला स्क्रीन टाईम कमी करावा असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिलेला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे काय म्हणणे

जागतिक आरोग्य संघटनेच्या ( WHO ) मते दोन वर्षांखालील लहान मुलांनी स्क्रीनकडे पाहणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरविले आहे. केवळ शिक्षणासाठी डोळ्यांची योग्य काळजी घेत 2 ते 5 वर्षांच्या मुलांना एक तास किंवा त्याहून कमी वेळे स्क्रीन पाहण्याची शिफारस केलेली आहे. आठवडाभर एक तास आणि विकेण्डला तीन सात अशी स्क्रीन पाहण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आहे. सहा वर्षे किंवा त्याहून मोठ्या वयाच्या मुलांबद्दल अशी काही शिफारस केलेली नसली तरी शारीरिक व्यायाम आणि दैनंदिन ॲक्टीव्हीटीज लहान मुलांनी करणे अपेक्षित आहे.

मुले भासमान जगात वावरतात

सतत माहीतीचा आणि मनोरंजनाचा मारा झाल्याने अति उत्तेजित होणे, एकाग्रता गमावणे यामुळे लहान मुले भासमान जगात वावरतात आणि खऱ्या जगातील ॲक्टीव्हीटी आणि नातेसंबंध विकसित करण्याच्या आनंदाला मुकतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वेग-वेगळ्या भाषा शिकताना मुलांना उशीर लागतो, मुलाला अनेक गोष्टींचे आकलन होत परंतू ते योग्य शब्द न वापरता चिन्हांद्वारे किंवा हाताने किंवा विशिष्ट खुणांद्वारे त्यांच्या गरजा व्यक्त करतात. अतिरिक्त मोबाईल किंवा स्क्रीन पाहल्याने मुलांचे बायोलॉजिकल घड्याळ बिघडते आणि ते डी-सिंक्रोनाईझ होते, ज्यामुळे त्यांच्या झोपेच्या – उठण्याच्या वेळेच्या चक्रावर देखील परिणाम होतो. स्लीप – वेक सायकल बिघडल्याने मुलांना स्मृती आणि लक्ष देण्याचा, एकाग्रतेने पाहण्याचे कोणतीही गोष्ट पटकन आकलन होण्याचे त्रास सुरु होतात.

आधी खेळा आणि नाचा

स्क्रीन टाईममध्ये वाढ, डिजिटल व्यसन आणि सायबर धमकावण्यामुळे मानसिक आरोग्य समस्या वाढतात, ज्यामुळे मूड कमी होतो, सामाजिक अलगाव होतो, स्वत: ची हानी होते आणि पदार्थांचा गैरवापर होतो. यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करावा, त्यांना खेळात बिझी करावे, त्यांना क्रिएटीव्ह ॲक्टीव्हीटी करण्यासाठी प्रेरित करावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुढील व्यक्तीमत्व विकार आणि मानसिक समस्यांना टाळण्यासाठी लहान मुलांना कमी वयातच सोशल मिडिया आणि टेक्नॉलॉजीचा जबाबदारीने वापर करण्याचे प्रशिक्षण द्यावे, जर चांगले आरोग्य हवे असेल तर बसणे कमी आणि खेळणे अधिक वाढवावे असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल.
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'.
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या.
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?.
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर.
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल.
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले.
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार.
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'.