रॉयल एन्फिल्डच्या 2 दमदार बाईक लाँच

मुंबई: रॉयल एन्फिल्डने (Royal Enfield) भारतात दोन नव्या मोटरसायकल लाँच केल्या आहेत. रॉयल एन्फिल्डने Bullet Trials Works Replica 350 आणि Bullet Trials Works Replica 500 या दोन बाईक बाजारात आणल्या आहेत. रॉयल एन्फिल्ड ट्रायल्स 350 ची शोरुम किंमत 1 लाख 62 हजार रुपये तर रॉयल एन्फिल्ड ट्रायल्स 500 ची किंमत 2 लाख 7 हजार रुपये […]

रॉयल एन्फिल्डच्या 2 दमदार बाईक लाँच
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई: रॉयल एन्फिल्डने (Royal Enfield) भारतात दोन नव्या मोटरसायकल लाँच केल्या आहेत. रॉयल एन्फिल्डने Bullet Trials Works Replica 350 आणि Bullet Trials Works Replica 500 या दोन बाईक बाजारात आणल्या आहेत. रॉयल एन्फिल्ड ट्रायल्स 350 ची शोरुम किंमत 1 लाख 62 हजार रुपये तर रॉयल एन्फिल्ड ट्रायल्स 500 ची किंमत 2 लाख 7 हजार रुपये आहे. या दोन्ही बाईक्स  Royal Enfield Bullet 350 आणि Bullet 500 वर आधारित आहेत.

खड्डे, खराब रस्त्यांवरील रायडिंगसाठी या बाईक बनवण्यात आल्या आहेत. नव्या ट्रायल्स बाईकची टँक आणि साईड पॅनल बुलेटपासूनच घेतल्या आहेत. ऑफरोड लूक देण्यासाठी नव्या बाईक्सचं मडगार्ड हे सध्याच्या बुलेटच्या तुलनेत छोटं आणि पातळ आहे.

दोन्ही बाईकमध्ये लांब हँडलबार, सिंगल सीट आणि लगेज कॅरियर आहे. नव्या बाईक्समध्ये ड्युअर डिस्क ब्रेक आणि ड्युअर चॅनल एबीएस सुविधा आहेत.

बुलेट ट्रायल्स 350 लाल फ्रेममध्ये तर बुलेट ट्रायल्स 500 मध्ये हिरवा पट्टा दिला आहे.

या दोन्ही बाईकच्या पुढच्या बाजूला 19 इंच व्हील आणि मागे 18 इंच व्हील दिला आहे. ऑफ रोड थीममुळे त्यांचे एक्ग्जॉस्टही वरच्या बाजूला ठेवण्यात आले आहे. लॉन्च करण्यात आलेल्या बाईक्समध्ये हेडलाईट ग्रिल आणि क्रॉसबार पॅडिंग आहे. ते अस्केसरी पॅकचा भाग आहे. 

शक्तीशाली इंजिन

दोन्ही बाईकच्या इंजिनबाबत बोलायचं झाल्यास, या बाईक्सना स्टॅण्डंर्ड बुलेट रेंजप्रमाणे इंजिन देण्यात आले आहेत.

बुलेट ट्रायल्स 350 मध्ये 346cc चे इंजिन आहे, जे 20hp पावर आणि 28Nm टार्क निर्मित करतं. 

बुलेट ट्रायल्स 500 मध्ये 499cc चं इंजिन आहे, जे 27.5hp पावर आणि 41.3Nm टार्क निर्मित करतं.

दोन्ही बाईक्सला 5 स्पीड गियरबॉक आहेत.

या नव्या ट्रायल्स बाईक्सचं नाव 50 च्या दशकातील जुन्या मोटरसायकल्सवरुन घेण्यात आलं आहे. ऑफ रोड रेसमध्ये अशा बाईक्सचा वापर केला जात होता. मात्र आता रॉयल एन्फिल्डने नवी कोरी ट्रायल्स बाईक लाँच केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.