Rugged Smartphone | एकदम रग्गड, दणकट स्मार्टफोन बाजारात, फिचर्स असे की तुम्ही व्हाल फिदा

Samsung Galaxy XCover 7 | स्मार्टफोन हातातून निसटून नुकसान होते. काहींच्या हातात तर मोबाईल टिकतच नाही. त्यावर सॅमसंगने एक जालीम उपाय आणला आहे. लोखंडासारखा मजबूत Samsung Galaxy XCover 7 स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. या दणकट स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स आहेत. जाणून घ्या किती रुपयांचा आहे हा स्मार्टफोन ?

Rugged Smartphone | एकदम रग्गड, दणकट स्मार्टफोन बाजारात, फिचर्स असे की तुम्ही व्हाल फिदा
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 11:22 AM

नवी दिल्ली | 7 February 2024 : अनेकांच्या हातात मोबाईल काही केल्या टिकतच नाही. एकतर तो वारंवार पडतो अथवा निसटतो. त्यामुळे मोबाईलचे मोठे नुकसान होते. त्यावर सॅमसंगने एक जबरदस्त उपाय शोधला आहे. लोखंडासारखा दणकट Samsung Galaxy XCover 7 हा स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. या सॅमंसगं मोबाईलमध्ये फीचर्स पण दमदार आहेत. या फोनला मिलिट्री-ग्रेड (MIL-STD-810H) मजबूतीसह बाजारात आणण्यात आले आहे.

कसा आहे फोन

दणकट फोन म्हणजे हा सर्वच बाबतीत मजबूत फोन आहे. या फोनचे डिझाईन एकदम खास असते. हा स्मार्टफोन हवामान, तापमान, अपघाती नुकसान आणि हातातून पडल्यामुळे होणारे नुकसान यापासून या स्मार्टफोनला वाचवतो. त्यासाठी तो खास तयार करण्यात आला आहे. Samsung Galaxy XCover 7 ची भारतातील किंमत आणि या स्मार्टफोनच्या इतर फीचर्स जाणून घ्या.

हे सुद्धा वाचा

Samsung Galaxy XCover 7 Specifications

  1. डिस्प्ले : 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह हा स्मार्टफोन येतो. या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन संरक्षणासाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसचा वापर केला आहे.
  2. चिपसेट: स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये 6nm वर आधारीत ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये कोणत्या कंपनीचे प्रोसेसर वापरण्यात आले आहे. त्याचा खुलासा कंपनीने केला नाही. काहींच्या मते या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6100 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
  3. कॅमेरा सेटअप : या स्मार्टफोनच्या मागील भागात 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहे. तर समोरील बाजूस सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहे. या स्मार्टफोन मध्ये 128 जीबी स्टोरेजचे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
  4. कनेक्टिव्हिटी : या स्मार्टफोनमध्ये 4जी LTE, वाय-फाय डायरेक्ट, 5जी, वाय-फाय 802.11 सपोर्ट, पोगो पिनसह युएसबी टाईप-सी पोर्ट, एनएफसी आणि जीपीएस सपोर्ट देण्यात आला आहे.
  5. इतर फीचर्स : या स्मार्टफोनमध्ये XCover Key देण्यात आली आहे. ही की तुमच्या मदतीला येणार आहे. तसेच आवाजासाठी डॉल्बी एटमॉस साऊंड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

Samsung Galaxy XCover 7 Price in India

या स्मार्टफोनची स्टँडर्ड एडिशन मॉडलची किंमत 27 हजार 208 रुपये असेल. तर एडिशनल मॉडलची किंमत 27 हजार 530 रुपये असेल. हा फोन केवळ 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट्स मिळेल. या फोनवर दोन वर्षांपर्यंतची वॉरंटी मिळेल.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.