इंटरनेटच्या देवाला ललनेचा फास; युलिया वाव्हिलोवा खरंच आहे का विषकन्या? टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांच्या अटकेची इनसाईड स्टोरी वाचली का?

Yulia Vailova - Pavel Durov : सध्या जगातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संकट ओढावले आहे. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सॲपच नाही तर आता टेलिग्रामवर सरकारी निर्बंधांचा फास आवळत आहे. प्रत्येक देशाच्या कायद्याचा बडगा या समाज माध्यमांवर उगरण्यात येत आहे. सर्वात पहिला बळी टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांचा गेला आहे.

इंटरनेटच्या देवाला ललनेचा फास; युलिया वाव्हिलोवा खरंच आहे का विषकन्या? टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांच्या अटकेची इनसाईड स्टोरी वाचली का?
युलिया वाव्हिलोवाने पावेल डुरोवला फसवलं का?
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 2:19 PM

तर त्याला जणू कोणतीच बंधने नको आहेत. तो मुळातच व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता. पण त्याच्या या भूमिकेचा दहशतवादी, लहान मुलांचे शोषण करणारे, वाईट कामांसाठी निधी जमा करणाऱ्यांनी फायदा उठवला. त्याचे टेलिग्राम हे जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सोशल मीडियाच्या जगात युझर्सच्या संख्येनुसार ते सहाव्या क्रमांकावर आहे. रशियातील या तरुणाने इंटरनेटचा देव होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि सत्यात उतरवले. मॅसेजिंगच्या विश्वात मोठा चमत्कार केला. जगभरातील विद्यार्थ्यांचा गळ्यातील ताईत असलेले टेलिग्राम प्रत्यक्षात आणले. पॉवेल डुरोव नाम तो सुनाही होगा.

जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तहेर संघटना मोसाद त्याच्या मागावर आहे. इतर देशांचा पण त्याच्यावर दबाव आहे. फ्रान्स सरकारने त्याला या 24 ऑगस्ट रोजी पॅरिसजवळ त्याच्या खासगी जेटने उतरताच अटक केली. त्याच्यावर संशय घेण्याइतपत चौकशीची आवश्यकता फ्रेंच न्यायालयाने व्यक्त केली. एकूणच टेलिग्रामचा सीईओ, मालक पॉवेल डुरोव याचे ग्रह फिरले आहेत, हे नक्की. अर्थात मॅसेजिंग जगतातील या बेताज बादशाहला या घडामोडींची कल्पना नव्हती असे नाही. पण तो निडर, बेडर आणि करारी बाण्याचा तितकाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. त्यासाठीची किंमत मोजायला जणू तो जीवावर उदार झाला आहे. वरवर अगदी साधं-सोप्या वाटणाऱ्या या स्टोरीत एका विषकन्येची एंट्री झाली नी माध्यमांचे लक्ष वेधले गेले.

युलिया वाव्हिलोवा, ही सौंदर्यवती रशियन, सौंदर्यासोबतच बुद्धीचे कोंदण असलेली ललना. क्रिप्टोकरन्सी कोच अशी तिची जगाला ओळख आहे. ती कन्टेंट क्रिएटर म्हणून इन्स्टाग्राम, टिकटॉक, युट्यूब आणि इतर अनेक सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर आलिशान जीवनशैलीचे चिक्कार छायाचित्र आणि चलचित्र तुम्ही चाळू शकता. तर जेव्हा पावेल डुरोव याला अटक झाली. तेव्हा ही सौंदर्य सम्राज्ञी त्याच्या सोबत खासगी जेटमधून उतरताना दिसल्याचा दावा युरोपातील मीडियाने केला. त्यानंतर ती मिस्ट्री गर्ल ठरली. तिचे दर्शनच झाले नाही. पावेल आणि तिच्या नात्याविषयी चर्चा सुरु झाली तर ती इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसादची एजंट असल्याचे दावे समोर आले. तिनेच पावेल याला फ्रान्समध्ये आणले आणि पुढील अटक नाट्य घडल्याचा दावा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

ती पॉवेलसाठी विषकन्या ठरल्याची चर्चा रंगली. जुन्या काळात गुप्तहेर महिलांना विषकन्या म्हटलं जायचं. त्या आपल्या सौंदर्याने सावजाला जाळ्यात अडकायच्या आणि शत्रू राष्ट्राच्या हाती द्यायच्या अथवा त्याच्या खात्मा करायच्या, अशा अनेक चुरस कथा आहे. त्यात ही आधुनिक कथा जोडल्या गेली आहे. पावेल आणि युलिया या दोघांची भेट होऊन फार काळ लोटला नसल्याचे समोर येत आहे. याच वर्षात या दोघांची भेट झाली. कझाकस्तान, किर्गिस्तान, अझरबैजान या देशात दोघे फिरताना दिसले. तिचे आणि पॉवेलचे एकाच स्थानावरील छायाचित्र, व्हिडिओज समाज माध्यमांवर दिसून येतात. त्यावरील दोघांच्या अनेक स्टोरीज. छायाचित्र सुद्धा सारखेच आहेत.

पॅरीस येथे पोहचण्यापूर्वी या दोघांनी अझरबैजान या देशातील बाकू येथे सोबत नाश्ता केला होता. ते दोघे एका हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करताना दिसत आहेत. त्यानंतर युलिया आणि पॉवेल एका व्हिडिओत एकत्र दिसत आहेत. हा व्हिडिओ युलियाने शूट केलेला आहे. एका दाव्यानुसार तिने हे व्हिडिओ आणि छायाचित्र मुद्दाम सोशल मीडियावर टाकले. त्यामुळे फ्रान्स आणि मोसाद या संघटनेला त्यांच्या प्रत्येक ठिकाणाची माहिती मिळत होती. ते जसे पॅरीस विमानतळावर खासगी जेटने उतरले तेव्हाच त्यांना फ्रेंच पोलिसांनी स्थानबद्ध केले.

युलिया वाव्हिलोवा ही मॉस्कोत वाढलेली आहे. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून ती दुबईत स्थायिक झाली. पॉवेल गेल्या काही वर्षांपासून दुबईत राहतो. त्याच्या टेलिग्रामचे कार्यालय पण दुबईतच आहे. युलियाची आई एकटेरिना यांनी पॅरिसमधील घडामोडीनंतर युलियासोबत संपर्क नसल्याचा दावा केला आहे. आपल्याला पॅरिस येथे गेल्यावर अटक होणार आहे हे माहिती असून सुद्धा पॉवेल तिथे का गेला याची पण सध्या चर्चा रंगली आहे. युलियाने त्याला पॅरिसला आणल्याचा दावा करण्यात येत आहे. शनिवारी 24 ऑगस्ट रोजी Le Bourget या पॅरिसजवळील विमानतळावर दोघांना अटक करण्यात आली होती. आता युलिया खरंच मोसादची एजंट आहे की, रशियन गुप्तहेर हे समोर आलेले नाही. पण युरोपातील माध्यमांनी तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत हे नक्की. ती कुठे गायब झाली, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. तिची बाजू अजूनही समोर आलेली नाही. पण चर्चांमध्ये सत्यता असेल तर पावेल याला अनेक देशांनी मिळून ट्रॅप केल्याची थेअरी खरी ठरु शकते.

पॉवेलने असे तयार केले साम्राज्य

पॉवेल डुरोव याचा 1984 मध्ये तत्कालीन सोव्हिएट यूनियन, रशियात जन्म झाला. आई-वडील बुद्धिवादी होते. भावासोबत तो सेंट पीटर्सबर्ग या नावाजलेल्या विद्यालयात शिकला. त्याच दरम्यान त्याचे आई-वडिल इटलीला स्थायिक झाले. पण दोन्ही भाऊ रशियातच शिकत होते. त्याचा मोठा भाऊ निकोलाई याचा त्याचावर मोठा प्रभाव आहे. निकोलाई हा गणितातील चॅम्प आहे. त्याने आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये 90 च्या दशकात सलग तीनदा सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. तर या भावाची मोठी छाप पॉवेलवर पडली.

Internet Prophet

शाळेत शिकताना अचाट असं काही करायचं, असं पावेल याने मनाशी पक्क केलं होतं. त्याचवेळी शाळेत त्याला संगणकीय तंत्रज्ञानात मोठी गती होती. पावेल कुठे दिसला नाही की तो हमखास शाळेच्या कम्प्युटर लॅब सापडणार हे त्याच्या मित्र-मैत्रिणींना माहिती होते. ज्या वयात मुलं इतर उद्योग करत त्यावेळी या पठ्ठ्याने त्याच्या विद्यालयातील सर्व संगणक प्रक्रियचा हॅक केली. त्याच्या शाळेतील प्रत्येक संगणकावर Must die असा संदेश असलेली स्क्रीन दिसू लागली. अखेरीस हा आपला पराक्रम असल्याचे त्याने जाहीर केले. इतकचं काय आपण इंटरनेटचा प्रेषित होणार असल्याचे त्याने एकदा शाळेत जाहीर केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पण हे निराळंच पाणी असल्याची कल्पना त्याच्या शिक्षकांना आली होती.

ऑर्कुट नंतर जगावर फेसबुकचे गारुड आले. पण अमेरिकन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक रशियात चालणार कसं? मग त्याला पर्याय म्हणून VKontakte ही फेसबुकची कॉपी पावेल डुरोव याने रशियात सुरु केले. पाहता पाहता हा प्लॅटफॉर्म रशियात लोकप्रिय झाला. व्लादीमीर पुतीन यांच्याविरोधात जनक्षोभ वाढला. त्यावेळी विरोधकांनी या प्लॅटफॉर्मचा वापर केला. अनेक फुटीरतावादी संघटना, आंदोलकांनी VKontakte चा शस्त्रासारखा वापर केला. रशियाच्या विविध शहरात पुतीनविरोधात आंदोलन भडकले. त्यावेळी या प्लॅटफॉर्मवरील सर्वांची माहिती देण्यासाठी पावेल याच्यावर दबाव आला. आंदोलकांची माहिती देण्यासाठी आणि त्यांचा कंटेट थांबवण्यासाठी दडपण आले. पण पावेल जुमानला नाही. तेव्हा गुंतवणूकदारांनी VKontakte मधून पावेल याला बाहेरचा रस्ता दाखवला.

त्यानंतर त्याने भावाच्या मदतीने 2013 मध्ये टेलिग्राम सुरु केले. तो संयुक्त अरब अमिरातच्या दुबईत स्थायिक झाला. तिथेच त्याने टेलिग्रामचे कार्यालय सुरु केले. पण त्याच्या कार्यालयात 30 पेक्षा जास्त कर्मचारी नाहीत. त्यातील 90 टक्के कर्मचारी विविध देशात फिरतात. ते एका ठिकाणी थांबत नाहीत. टेलिग्राममध्ये एचआर विभाग नसल्याचे सांगण्यात येते. सर्व काही पावेलच हाताळतो. विविध देशांचा सतत ससेमिरा असल्याने तो फिरत असतो. त्याच्याकडे फ्रान्स, युएई, सेंट किट्स, नेविस या देशासह रशियाचे नागरिकत्व आहे. त्याच्यावर फ्रान्स सरकारने गंभीर आरोप लावलेले आहेत. त्याला आता फ्रान्स सोडून जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.