नवी दिल्ली : भारतीय लष्कराला आता संवाद साधण्यासाठी कोणत्याही एक्सटर्नल अॅपची (Telegram, WhatsApp, Messenger etc) आवश्यकता भासणार नाही, कारण लष्कराने स्वत:साठी एक मेसेजिंग अॅप तयार केलं आहे. Secure Application for Internet (SAI) असं या अॅपचं नाव आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने एसएआय अॅप बनविलं आहे. हे अॅप खास अँड्रॉइड युजर्ससाठी तयार करण्यात आलं आहे. परंतु अद्याप ते गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध झालेलं नाही. (SAI : Indian Army launches instant messaging app secure application for internet)
मेसेज पाठवण्यासह इतरही कामं करणार
Whatsapp प्रमाणे या अॅपमध्येदेखील एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फिचर देण्यात आलं आहे. या अॅपद्वारे व्हाईस-व्हिडीओ कॉलिंग, टेक्स्ट मेसेज करता येतील. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, हे अॅप व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, SAMVAD आणि GIMS सारखेच आहे. या अॅपमध्ये चॅटिंग सुरक्षित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रोटोकॉल फॉ़लो केले आहेत.
गरजेप्रमाणे बदल करणार
संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की SAI अॅपमध्ये स्थानिक इन-हाऊस सर्व्हर आणि कोडिंगद्वारे सुरक्षा फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत, जे आवश्यक असल्यास ट्विक केले जाऊ शकतात. संरक्षण मंत्रालयाने याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, या अॅपचे कंप्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया (सीईआरटी-इन) आणि आर्मी सायबर ग्रुपने सखोल परीक्षण केले आहे.
एसआयआय अॅपचे Intellectual property rights (आईपीआर) दाखल करणे आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर काम करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. सुरक्षित मेसेजेस पाठवण्यासाठी या अॅपचा वापर संपूर्ण सैन्य करेल. या अॅपला दिलेले SAI हे नाव हे कर्नल शंकर साई यांच्या नावावरुन देण्यात आले आहे. कर्नल शंकर साई यांनीच हे अॅप बनवले आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जुलै महिन्यात भारतीय लष्कराने आपल्या जवानांना आणि कर्मचार्यांना फेसबुक इन्स्टाग्रामसारख्या अॅप्ससह 89 अॅप्स फोनमधून डिलीट करण्यास सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर लष्कराकडून स्वतःचे मसेजिंग अॅप लाँच करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
Amazon Sale : सॅमसंग, शाओमी, विवोच्या ‘या’ बजेट स्मार्टफोन्सवर भरघोस सूट
Redmi K30S लाँच, 8 जीबी रॅम, 5000mAh च्या बॅटरीसह दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत
टाटा उद्योग समूह ‘अॅपल’मध्ये 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार!
(SAI : Indian Army launches instant messaging app secure application for internet)