CCTV मध्ये शरीफुल की इतर कोणी? सैफ अली खानच्या हल्लेखोराची ओळख पटणार कशी? हे तंत्रज्ञान करेल उलगडा
Saif Ali Khan Attack Case : सैफ अली खानच्या हल्लेखोराभोवती एक गूढ वलय तयार होत आहे. हल्लेखोर शरिफुल आणि सीसीटीव्हीतील आरोपीचा चेहरा जुळत नसल्याचे दावे करण्यात येत आहे. या शंका कुशंकाना विराम देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.

सैफ अली खानवर घरात घुसून 16 जानेवारी रोजी भल्या पहाटे हल्ला करण्यात आला होता. त्या चोराला पोलिसांनी मोठं कोम्बिंग ऑपरेशन करून बेड्या ठोकल्या. पण तो हा नव्हेच, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम (Mohammad Shariful Islam) आणि सीसीटीव्हीतील आरोपी यांची चेहरापट्टी जुळत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. आरोपीच्या वडिलांनी सुद्धा आपल्या मुलाला अडकवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या शंका कुशंकाना विराम देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.
हल्लेखोराची अशी पटवणार ओळख?
एका माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याच्या बाईकचा नोंदणी क्रमांक नोंदवला होता. आता आरोपीचा चेहरा ओळखण्यासाठी पोलीस चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा (Face Recognition Technology) वापर करणार आहेत. तपासा दरम्यान आरोपी हा दादर रेल्वे स्टेशनबाहेर तीन ठिकाणी सीसीटीव्हीत कैद झाला होता. हल्लेखोर याच परिसरात एका मजूराला सुद्धा भेटायला गेला होता.




Face Recognition तंत्रज्ञान आहे तरी काय?
फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजी हे बायोमॅट्रिक टेक्नॉलॉजीचा एक भाग आहे. हे तंत्रज्ञान चेहऱ्यावरून त्या व्यक्तीची ओळख पटवते. याला बायोमॅट्रिक आर्टिफिशियल इंटेलिजेन्स बेस ॲप्लिकेशन असे म्हणतात. कोणताही फोटो-व्हिडिओ वा रिअल टाईममधील लोकांची ओळख पटवण्यासाठी फेशियल रिकग्निशन सिस्टमचा वापर करण्यात येतो.
फेस रिकग्निशन टेक्नोलॉजीचा फायदा
या तंत्रज्ञानामुळे विना कोणता संपर्क करता लोकांची ओळख पटवता येऊ शकते. या तंत्रज्ञानाचा वापर कर्मचार्यावर लक्ष ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. याशिवाय या तंत्रज्ञानाचा वापर आरोपी, गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी करण्यात येते.
हे तंत्रज्ञान अल्गोरिदम तंत्रावर काम करते. यामध्ये चेहरा पट्टीवरून व्यक्तीची ओळख पटते. हे तंत्रज्ञान फेस डाटा पाहते. जमा केलेल्या डाटावरून नंतर चेहर्याची ओळख पटते. स्मार्टफोन, कॅमेरा आणि सिस्टिमचा वापर या तंत्रज्ञानासाठी करण्यात येतो. आता आरोपीचा चेहरा ओळखण्यासाठी पोलीस चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत. तपासा दरम्यान आरोपी हा दादर रेल्वे स्टेशनबाहेर तीन ठिकाणी सीसीटीव्हीत कैद झाला होता. आता सीसीटीव्हीची मदत घेण्यात येणार आहे.