Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 महिन्यांच्या बाळाला वाचविणाऱ्या चिमुरडीचे प्रसंगावधान; आनंद महिंद्रा झाले चकित, दिली नोकरीची ऑफर थेट

Ananad Mahindra : 13 वर्षांच्या मुलीने असं काही प्रसंगावधान दाखवले की, महिंद्रा आणि महिंद्रा समूहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी तिला थेट नोकरीची ऑफरच दिली. माकडापासून या मुलीने 15 महिन्यांच्या बाळाचे प्राण वाचवले. एका नामी युक्तीने या मुलीचे भाग्य उघडले, नेमके काय झाले...

15 महिन्यांच्या बाळाला वाचविणाऱ्या चिमुरडीचे प्रसंगावधान; आनंद महिंद्रा झाले चकित, दिली नोकरीची ऑफर थेट
13 वर्षांच्या मुलीच्या प्रसंगावधानावर आनंद महिंद्रा खूश
Follow us
| Updated on: Apr 07, 2024 | 9:29 AM

देशातील दिग्गज उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्यावर 13 वर्षांच्या मुलीची छाप पडली. या लहानगीच्या प्रसंगावधानाने ते एकदम हरकून गेले. या या मुलीने 15 महिन्यांच्या बाळाचे माकडापासून प्राण वाचवले. तिच्या या कामगिरीवर बेहद खूश होऊन आनंद महिंद्रा यांनी तिला थेट नोकरीची ऑफर दिली. दस्तूरखुद्द आनंद महिंद्रांनीच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) ही माहिती दिली. ते समाज माध्यमांवर सक्रिय असतात. त्यांच्या मजेशीर आणि प्रेरणादायी पोस्टमुळे मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. शनिवारी त्यांनी यासंबंधीची पोस्ट टाकताच ती व्हायरल झाली. आपल्या छोट्या बहिणीचा ‘ॲलेक्सा’ (Alexa) या डिव्हाईसच्या मदतीने जीव वाचविणाऱ्या या मुलीचे कौतुक होत आहे. काय आहे नेमकी घटना?

उत्तर प्रदेशातील घटना

हे सुद्धा वाचा

ही घटना उत्तर प्रदेशातील आहे. बस्ती हा तिथला जिल्हा. या ठिकाणी एका 13 वर्षाच्या मुलीने ही कामगिरी बजावली. तिने ॲलेक्सा डिव्हाईसच्या मदतीने केवळ घरातूनच माकडाला पळवले नाही तर तिच्या प्रसंगावधानाने 15 महिन्यांच्या तिच्या बहिणीचे पण प्राण वाचवले. माकडांचा या ठिकाणी उच्छाद आहे. त्यातील एका माकडाने थेट जिथे हे बाळ होते. त्या खोलीत प्रवेश केला. ते बाळाकडे जात असतानाच या मुलीने प्रसंगावधान राखत ॲलेक्सा या डिव्हाईसला या मुलीने कुत्र्याचा आवाज काढण्याची व्हाईस कमांड दिली. त्यानंतर ॲलेक्सा या डिव्हाईसमधून कुत्र्याचा आवाज आला. हे प्रसंगावधान उपयोगी पडले. तिची हुशारी कामी आली. माकड त्या खोलीतून पळाले. मुलीने लहानग्या बहिणीचाच नाही तर आपला जीव पण वाचवला.

आनंद महिंद्राने दिली नोकरीची ऑफर

आनंद महिंद्रा यांनी या मुलीचे कौतुक केले. त्यांनी त्यांच्य अधिकृत एक्स हँडलवर हा प्रसंग कथन केला. या युगात आपण तंत्रज्ञानाचे नोकर होणार की मालक हा प्रश्न आहे. या प्रसंगावधानाने तंत्रज्ञान हे नेहमी मानवी बुद्धीला प्रोत्साहन देणारे असल्याचे अधोरेखित झाले. तिचे प्रसंगावधान असाधारण आहे. या मुलीमध्ये नेतृत्व गुण आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर ही मुलगी कॉर्पोरेट क्षेत्रात येण्याचा विचार करत असेल तर मला आशा आहे की, महिंद्रा राईजमध्ये आम्ही तिच्यासोबत काम करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निकिताची कामगिरी

बस्ती जिल्ह्यातील रहिवाशी 13 वर्षीय निकिताने प्रसगांवधान राखत लहानग्या बहिणीचे पण प्राण वाचवले. तिने ॲलेक्सा या डिव्हाईसला कुत्र्याचा आवाज काढण्यास सांगितले. त्यामुळे माकड त्या खोलीतून पळाले. तिचे ही कामगिरी पाहून आनंद महिंद्रा प्रभावित झाले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचा तिला फायदा झाला. तिला महिंद्रांनी नोकरी देऊ केली.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.