सॅमसंग मोबाईल प्रेमींसाठी आंनदाची बातमी, कंपनीने स्पष्टच सांगितलं की…
सॅमसंग कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर ए सीरिजबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
मुंबई : तुम्ही सॅमसंग स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या महिन्यात कंपनी गॅलक्सी एस 23 सीरिज लाँच केली होती. त्यानंतर आता कंपनी नवी सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे सॅमसंग कंपनीने गॅलक्सी ए सीरिजच्या मिड रेंज 5जी लाँच करण्याची घोषणा केलीआहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवर याबाबतची घोषणा केली आहे. सॅमसंग कंपनीने गॅलक्सी ए 34 5 जी आणि गॅलक्सी ए 54 5 जी स्मार्टफोन 16 मार्च रोजी सादर करणार असल्याचं जाहीर केलं आहे. दुपारी 12 वाजता या फोनचं लाँचिंग होणार आहे.
Galaxy A54 आणि Galaxy A34 ची खासियत
सॅमसंग गॅलक्सी ए सीरिजच्या नव्या स्मार्टफोनमध्ये आयपी 67 रेटिंग असणार आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन वॉटरप्रुफ असेल. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचं कोटिंग पाण्यांचे थेंब आणि स्क्रॅचपासून बचाव करेल. या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंग असेल की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Galaxy A54 आणि Galaxy A34 चं स्पेसिफिकेशन्स
5 जी स्मार्टफोनमध्ये ओआयएस सपोर्टसह ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. गॅलेक्सी ए 54 मध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असणार आहे. यात f/2.2 अपर्चर असलेल्या 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगर कॅमेरा आमि 5 मेगा पिक्सल मायक्रो कॅमेरा असणार आहे. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असेल.
टीपस्टरनुसार, Galaxy A54 मध्ये 6.4 इंचाची एमोलेड स्क्रिन आणि 5एनएम एक्सिनोस 1380 चिपसेट असेल. स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन 25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो.
Galaxy A54 आणि Galaxy A34 ची किंमत
Galaxy A54 5जी व्हेरियंटची किंमत 45,500 रुपये इतकी असू शकते. Galaxy A34 5 जी किंमत 36,600 रुपये इतकी असू शकते. असं असलं तरी भारतीय बाजारात या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होऊ शकते. मार्च महिन्याच्या शेवटी या फोनची विक्री बाजारात सुरु होईल.