मुंबई : कोरीयन स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने (Samsung) आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे (5G Mobile Phone) आणि त्याचे नाव सॅमसंग गॅलेक्सी ए53 5जी (Samsung Galaxy A53 5G) असे आहे. यामध्ये 120hz डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये Exynos 1280 चिपसेट आणि 8 GB पर्यंत रॅम देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप (Quad Camera Setup) आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. तसेच यामध्ये चार वेगवेगळे कलर व्हेरियंट देण्यात आले आहेत. हा फोन वॉटर आणि डस्ट रेसिस्टन्ससह येतो. यात 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
Samsung Galaxy A53 5G च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरुवातीची किंमत 34,499 रुपये इतकी आहे, ज्यामध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. याशिवाय 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 35,999 रुपये मोजावे लागतील. आजपासून (27 मार्च) या फोनची डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ऑसम ब्लू आणि ऑसम व्हाईट रंगांमध्ये येतो.
Samsung Galaxy A53 5G च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यात 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर AMOLED इन्फिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. हा फोन Octacore Exynos 1280 चिपसेट आणि 8 GB पर्यंत RAM सह येतो. यामध्ये 128 GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे, युजरला अधिक गरज भासल्यास यूजर्स 1 TB पर्यंतचे SD कार्ड या फोनमध्ये इन्सटर्ट करु शकतात.
Samsung Galaxy A53 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे जो f/1.8 लेन्ससह येतो. याव्यतिरिक्त, यात 12 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. तिसऱ्या कॅमेऱ्यामध्ये 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सेलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगसह येते. तसेच हा फोन IP67 रेटिंग सह येतो.
Bid adieu to all the worry of water spills and splashes with the awesome new #GalaxyA53 5G. And whether it’s a pool party or the monsoons, the one thing you don’t have to worry about is the awesome new Galaxy A53 5G getting wet. pic.twitter.com/85l2pSM1Jo
— Samsung India (@SamsungIndia) March 26, 2022
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स