क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

कोरीयन स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने (Samsung) आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे (5G Mobile Phone) आणि त्याचे नाव सॅमसंग गॅलेक्सी ए53 5जी (Samsung Galaxy A53 5G) असे आहे. यामध्ये 120hz डिस्प्ले देण्यात आला आहे.

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Samsung Galaxy A53 5G
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 4:58 PM

मुंबई : कोरीयन स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने (Samsung) आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे (5G Mobile Phone) आणि त्याचे नाव सॅमसंग गॅलेक्सी ए53 5जी (Samsung Galaxy A53 5G) असे आहे. यामध्ये 120hz डिस्प्ले देण्यात आला आहे. या आठवड्यात हा मोबाईल फोन जागतिक बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. या फोनमध्ये Exynos 1280 चिपसेट आणि 8 GB पर्यंत रॅम देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप (Quad Camera Setup) आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. तसेच यामध्ये चार वेगवेगळे कलर व्हेरियंट देण्यात आले आहेत. हा फोन वॉटर आणि डस्ट रेसिस्टन्ससह येतो. यात 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A53 5G च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरुवातीची किंमत 34,499 रुपये इतकी आहे, ज्यामध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. याशिवाय 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 35,999 रुपये मोजावे लागतील. हे स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत आणि त्याची डिलिव्हरी 27 मार्चपासून सुरू होईल. हा स्मार्टफोन ब्लॅक, ऑसम ब्लू आणि ऑसम व्हाईट रंगांमध्ये येतो.

Samsung Galaxy A53 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A53 5G च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यात 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर AMOLED इन्फिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. हा फोन Octacore Exynos 1280 चिपसेट आणि 8 GB पर्यंत RAM सह येतो. यामध्ये 128 GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे, युजरला अधिक गरज भासल्यास यूजर्स 1 TB पर्यंतचे SD कार्ड या फोनमध्ये इन्सटर्ट करु शकतात.

Samsung Galaxy A53 5G चा कॅमेरा सेटअप

Samsung Galaxy A53 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे जो f/1.8 लेन्ससह येतो. याव्यतिरिक्त, यात 12 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. तिसऱ्या कॅमेऱ्यामध्ये 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सेलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगसह येते. तसेच हा फोन IP67 रेटिंग सह येतो.

इतर बातम्या

100 हून अधिक वॉच फेसेस, 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप, Truke Horizon Smartwatch बाजारात, किंमत…

Paytm Payments Bank भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला विकतेय? डेटा लीक्सच्या दाव्यांवर कंपनी म्हणते…

आधार-पॅन कार्ड लिंक करा, अन्यथा 10,000 रुपयांचा दंड, पाहा SMS द्वारे Aadhaar-Pan लिंक करण्याची सोपी पद्धत

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....