64 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरीसह Samsung Galaxy A72 लाँच, किंमत…
सॅमसंग कंपनी आपल्या गॅलेक्सी ए सिरीजसह (Galaxy A Series) भारतात मिड-टियर प्रीमियम रेंजमध्ये आपली स्थिती अधिक मजबूत करत आहे.
मुंबई : सॅमसंग (Samsung) कंपनी आपल्या गॅलेक्सी ए सिरीजसह (Galaxy A Series) भारतात मिड-टियर प्रीमियम रेंजमध्ये आपली स्थिती अधिक मजबूत करत असून कंपनीने नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. 6.7 इंचांच्या स्क्रीनसह Galaxy A72 मध्ये ओआयएस (ऑप्टिकल ईमेज स्टेबिलायजेशन) आणि 64 मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 30 पट अधिक झुम, वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंटसाठी देण्यात आलेल्या आयपी 67 रेटिंगसह अधिक शक्तिशाली बॅटरी आणि नव्या डिझाईनसह जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. (Samsung Galaxy A72 launched in india with 64MP camera; know price and Features)
ओआयएसमुळे एखादा फोटो किंवा व्हिडिओ कॅप्चरदरम्यान, अचानक फोटो ब्लर होणे किंवा फोटो हलण्याची समस्या दूर होईल. हे डिव्हाइस सॉफ्ट हेज फिनिशसह ऑसम ब्लॅक, ऑसम व्हॉयलेट, ऑसम व्हाइट आणि ऑसम ब्लू रंगात सादर केले गेले आहे. हे डिव्हाईस 2.2 गीगाहर्ट्झ ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी 8 एनएम प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. गेमिंगच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी यात गेमिंग बूस्टर फीचरदेण्यात आले आहे.
या स्मार्टफोनमध्ये सुपर एमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90 हर्ट्ज इतका आहे. याच्या कॅमेऱ्याविषयी सांगायचे झाल्यास Galaxy A72 मध्ये 64 एमपी क्वाड कॅमेरा सेटअप आहे, जो अल्ट्रा वाइड लेन्स आणि मॅक्रो लेन्ससह सादर करण्यात आला आहे. Galaxy A72 ची किंमत 8 जीबी प्लस 128 जीबी व्हेरिएंटसाठी 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 8 जीबी प्लस 256 जीबी व्हेरिएंटसाठी 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Nokia चे नवे फोन कंपनीचे अच्छे दिन परत आणणार?
नोकिया (Nokia) कंपनी 8 एप्रिल रोजी एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी X सिरीज, G सिरीजमधील स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. नोकिया जी 10 (Nokia G10), नोकिया जी 20 (Nokia G20), नोकिया एक्स 10 (Nokia X10) आणि नोकिया एक्स 20 (Nokia X20) या स्मार्टफोन्सबाबतची बरीचशी माहिती काही दिवसांपूर्वी लीक झाली होती. 8 एप्रिलच्या इव्हेंटमध्ये कंपनी हे स्मार्टफोन लाँच करु शकते.
नोकियाचे एक्स सिरीज स्मार्टफोन हे बजेट 5 जी फोन असतील. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 SoC सह 5000mAh बॅटरी असेल. तर G10 आणि G20 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. हे फोन 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:30 वाजता लाँच केले जातील. परंतु आतापर्यंत फोनबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. नोकिया जी सिरीजची प्रारंभिक किंमत 11,999 रुपये असू शकते आणि हा हँडसेट ब्लू आणि पर्पल रंगात येईल.
इतर बातम्या
भारतात OnePlus 9 Pro ची विक्री सुरु, कंपनीकडून शानदार ऑफर
12GB/512GB, 5G कनेक्टिव्हिटीसह Mi 11 सिरीज बाजारात, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स
OnePlus 9 ला टक्कर देणाऱ्या Vivo X60 Pro मध्ये काय आहे खास?
(Samsung Galaxy A72 launched in india with 64MP camera; know price and Features)