चार कॅमेरे, दमदार बॅटरी, Samsung Galaxy F62 किंमत किती?

सॅमसंगच्या नव्या फोनचे स्पीडसोबत कनेक्शन असल्याचे दिसत आहे. (Samsung Galaxy F62 features And Price) 

चार कॅमेरे, दमदार बॅटरी, Samsung Galaxy F62 किंमत किती?
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 4:29 PM

मुंबई : वेग हा आपल्या सर्वांच्या आयुष्यात कायमच महत्त्वाचा असतो. रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या रेसिंग कारपासून इंटरनेटच्या वेगापर्यंत सर्वच गोष्टी महत्त्वाच्या असतात. सध्या सोशल मीडियावर Speedy हा शब्द ट्रेंड होत आहे. सॅमसंग या कंपनीने नव्या फोनच्या जाहिरातीसाठी Speedy हा शब्द वापरला आहे. याबाबतचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओच्या टीझरच्या शेवटी Samsung च्या बिग लाँच- द ऑल न्यू Samsung Galaxy F62 असे लिहिले आहे. या व्हिडीओनुसार सॅमसंगच्या नव्या फोनचे स्पीडसोबत कनेक्शन असल्याचे दिसत आहे. (Samsung Galaxy F62 features And Price)

Samsung Galaxy F62  हा नवा स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार आहे. हा फोन Galaxy F41 या फोनचे अपग्रेडड वर्जन आहे. या फोनचे बॅटरी आणि कॅमेरा दोन्हीही दमदार आहेत. Samsung Galaxy F62 या स्मार्टफोन #FullOnSpeedy हा फ्लॅगशिप 7nm Exynos 9825 प्रोसेसरसोबत लाँच केला आहे. जो स्नॅपड्रॅगन 765 जी पेक्षा अधिक दमदार असेल. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गीकबेंच लिस्टिंगवर हा फोन Exynos 9825 चिपसेट सोबत पाहायला मिळाला होता.

Samsung फ्लॅगशिप 7nm Exynos 9825 प्रोसेसर हा दमदार असल्याचे याआधीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. हा प्रोसेसर अधिक वेगवान, सक्षम आणि फास्ट परफॉर्मिंग आहे. 7nm EUV टेक्नोलॉजी हा फक्त चांगला परफॉर्मन्सचं देत नाही, तर प्रोसेसरची क्षमताही वाढवतो.

Exynos 9825 प्रोसेसर हा इतर सर्व प्रोसेसरच्या तुलनेत 32 टक्के जास्त क्षमतेने काम करतो. हा प्रोसेसर चांगला व्हिडीओ Viewing experience देतो. त्यामुळे Samsung Galaxy F62 हा फोन ऑल राऊंडर #FullOnSpeedy स्मार्टफोन ठरण्याची शक्यता आहे. तसेच या फोनला  7nm EUV टेक्नोलॉजीमुळे या स्मार्टफोनला दमदार बॅटरी बॅकअप देण्यात आलं आहे. त्यामुळे फोनचा जास्त वापर करणाऱ्यांसाठी हा फोन उत्तम पर्याय ठरु शकतो.

दमदार फीचर्स

या फोनमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी आणि 6.7 इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. हा फोन 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसोबत लाँच केला जाणार आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप असेल, तर सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोनची किंमत 25 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  हा स्मार्टफोनची विक्री Flipkart आणि Samsung.com या वेबसाईटवर केली जाणार आहे.(Samsung Galaxy F62 features And Price)

Samsung Galaxy F62 स्पेसिफिकेशन्स

परफॉर्मन्स Exynos 9611 (10nm)
डिस्प्ले 6.5 inches (16.51 cm)
स्टोरेज 128 GB
कॅमरा 64 MP + 12 MP + 5 MP + 5 MP
बॅटरी 4500 mAh
किंमत 22155
रॅम 6 GB, 6 GB

संबंधित बातम्या : 

Realme X7 मिळणार फ्लॅट 2000 रुपयांचं डिस्काऊंट, आजच करा बूकिंग

व्हॅलेंटाईनआधी शाओमीने या वस्तूची किंमत केली कमी, आता 3 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार ही वस्तू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.