Samsung Galaxy Note 20 लवकरच लाँच होणार, स्मार्टफोनचे डिझाईन समोर

येत्या डिसेंबरपर्यंत Galaxy Note 20 हा स्मार्टफोन बाजारात येऊ शकतो, अशी माहिती समोर येत (Samsung Galaxy Note 20) आहे.

Samsung Galaxy Note 20 लवकरच लाँच होणार, स्मार्टफोनचे डिझाईन समोर
Follow us
| Updated on: Jan 27, 2020 | 4:40 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून Samsung आपल्या स्मार्टफोनच्या संख्येत सातत्याने वाढ करत (Samsung Galaxy Note 20) आहे. नुकतंच कंपनीने भारतात Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite हे दोन फोन लाँच केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन हे ओरिजनल वेरियंटच्या लाईट वर्जन्स होते. त्यानंतर आता कंपनी नेक्स्ट जनरेशन गॅलेक्सी नोट स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. येत्या डिसेंबरपर्यंत Galaxy Note 20 हा स्मार्टफोन बाजारात येऊ शकतो, असे म्हटलं जात आहे

Galaxy Note 20 या स्मार्टफोनचे डिझाईन आइस यूनिवर्स या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. यावरुन काही तज्ज्ञांनी या नव्या स्मार्टफोनमधील अपकमिंग फ्लॅगशिप फोनच्या फिचरचा अंदाज लावला आहे. यानुसार सॅमसंगने यंदाच्या वर्षीही आपल्या स्मार्टफोनचे डिझाईन जवळपास समान ठेवले आहे.

येत्या महिन्यात लाँच होणाऱ्या Galaxy S20 शी मिळत्या जुळत्या डिझाईन आणि फिचर्स गॅलेक्सी नोट 20 असू शकतो. यात बॅक पॅनलमध्ये असणारे कॅमेरा युनिटही असणार आहे.

या फोनचे फ्रंट लूक नेमकं कसं असेल? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या फोनचे कंट्रोल बटण डाव्या बाजूला असू शकतात अशी माहिती समोर येत आहे. गॅलेक्सी S20 मध्ये ही बटण उजव्या बाजूला होती. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसोबत येतो. नव्या गॅलेक्सी नोट 20 च्या बॉटममध्ये यूएसबी टाईप-C कनेक्टर आणि स्टायलस कंपार्टमेंटही देण्यात आलं आहे.

या फोनचे स्पेसिफिकेशन्सबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोन कमीत कमी 8 जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटपेक्षा कमी असू शकतो. या फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसोबत क्वॉड HD+ डायनामिक AMOLED डिस्प्ले दिला (Samsung Galaxy Note 20) आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.