108MP कॅमेरासह सॅमसंगच्या Galaxy S21 सिरीजचे तीन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

सॅमसंगने नुकतेच Galaxy Unpacked 2021 इव्हेंटमध्ये बहुप्रतीक्षित Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्स लाँच केले आहेत.

108MP कॅमेरासह सॅमसंगच्या Galaxy S21 सिरीजचे तीन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 2:54 PM

मुंबई : सॅमसंगने नुकतेच Galaxy Unpacked 2021 इव्हेंटमध्ये मच-अवेटेड Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Galaxy S21, Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. हे स्मार्टफोन्स रेक्टँग्युलर कॅमेरा मॉड्यूल आणि ट्रिपल कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आले आहेत. (Samsung Galaxy S21 Series Smartphones launched, check price and specification)

सॅमसंग Galaxy S21 सिरीजमध्ये Exynos 2100 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. असा दावा करण्यात आला आहे की, यामधील 5G इंटिग्रेटेड मोबाईल प्रोसेसर दुसऱ्या प्रोसेसर्सच्या तुलनेत सर्वात फास्ट आहे. हे तिन्ही फोन 5 जी टेक्नोलॉजीला सपोर्ट करतात. Galaxy S21 तीन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. तर Galaxy S21+ चार कलर वेरियंटसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अंड्रॉयड 11 वर बेस्ड आहेत. तसेच हे फोन One UI 3.1 वर काम करतील. यामध्ये डुअल सिम (नॅनो) सपोर्ट देण्यात आला आहे.

Exynos 2100 प्रोसेसर 200 मेगापिक्सलपर्यंतच्या कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करतो. तसेच या प्रोसेसरसोबत 6 इनडिव्हिजुअल सेन्सर वापरता येतील. तसेच पिक्चर क्वालिटीदेखील जबरदस्त मिळेल. हा प्रोसेसर 5 जी तंत्रज्ञानालाही सपोर्ट करतो. सोबतच यामध्ये सुपरफास्ट डाऊनलोड स्पीड मिळतो. या प्रोसेसरमध्ये 5 नॅनोमीटर EUV (एक्सट्रीम अल्ट्रा वायलेट) प्रोसेस नोड दिला गेला आहे. हा प्रोसेसर यापूर्वी लाँच करण्यात आलेल्या Exynos प्रोसेसर्सपेक्षा अधिक दमदार आहे.

जबरदस्त फिचर्स

गॅलेक्सी एस 21 मध्ये 6.2 इंचांचा फुल-एचडी+ इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याची पिक्सेल डेन्सिटी 421ppi इतकी आहे. याचा पॅनल फ्रंट कॅमेरासाठी एक पंच-होलचं काम करतो. गॅलेक्सी S21+ थोडा मोठा आहे. याचा डिस्प्ले 6.7 इंचांचा आहे. या डिस्प्लेची पिक्सेल डेन्सिटी 394ppi इतकी आहे. गॅलेक्सी S21 अल्ट्रा हा स्मार्टफोन S21 आणि S21+ या दोन्ही फोन्सपेक्षा मोठा आहे. या फोनच्या डिस्प्लेची पिक्सेल डेन्सिटी 515ppi इतकी असून डिस्प्ले 6.8 इंचांचा आहे. गॅलेक्सी एस 21 अल्ट्राचा डिस्प्ले गॅलेक्सी नोट सिरीजच्या एस पेनला सपोर्ट करतो.

शानदार कॅमेरा आणि बॅटरी

या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास S21 आणि S21+ ममध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64-मेगापिक्सलचा आहे, सेकेंडरी कॅमरा 12-मेगापिक्सल आणि वाईड-अँगल लेन्स 12-मेगापिक्सलची आहे. यामध्ये 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. गॅलेक्सी S21 अल्ट्रामध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 108-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, सेकेंडरी कॅमरा 12 मेगापिक्सलचा आणि दोन लेन्स 10-10 मेगापिक्सलच्या देण्यात आल्या आहेत. गॅलेक्सी S21 अल्ट्रामध्ये 40-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

गॅलेक्सी S21 मध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी S21+ मध्ये 4800mAh ची तर S21 Ultra मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तिन्ही फोन 25W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात.

किंमत किती?

सॅमसंगने घोषणा केली आहे की, गॅलेक्सी एस 21 ची किंमत 799 डॉलर (जवळपास 58 हजार रुपये), गॅलेक्सी S21 + ची किंमत 999 डॉलर (जवळपास 73 हजार रुपये) आणि गॅलेक्सी एस 21 अल्ट्राची किंमत 1199 डॉलर (जवळपास 87 हजार रुपये) इतकी आहे.

हेही वाचा

शाओमीच्या Mi 10i फोनची बंपर विक्री, पहिल्याच सेलमध्ये तब्बल 200 कोटींची उलाढाल

यावर्षीच्या सुरुवातीलाच ढासू स्मार्टफोन्स लाँच होणार, फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये धडाका

सेल्फी कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर, 7 हजारांहून कमी किमतीतील Best स्मार्टफोन

Samsung ने तब्बल 75 तोळे सोनं वापरुन बनवला स्मार्टफोन, किंमत ऐकून थक्क व्हाल

(Samsung Galaxy S21 Series Smartphones launched, check price and specification)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.