एकदा चार्ज करा आणि नॉनस्टॉप 18 तास गाणी ऐका, Samsung चे जबरदस्त हेडफोन्स लाँच

सॅमसंग लेवल U2 नेकबँड स्टाईल वायरलेस हेडफोन्स (Samsung Level U2 Neckband-Style Wireless Headphones) भारतात लाँच करण्यात आले आहेत.

एकदा चार्ज करा आणि नॉनस्टॉप 18 तास गाणी ऐका, Samsung चे जबरदस्त हेडफोन्स लाँच
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 2:58 PM

मुंबई : सॅमसंग लेवल U2 नेकबँड स्टाईल वायरलेस हेडफोन्स (Samsung Level U2 Neckband-Style Wireless Headphones) नुकतेच भारतात लाँच करण्यात आले आहेत. हे नवे हेडफोन्स एकदा चार्ज केल्यावर तब्बल 500 तासांचा स्टँडबाय टाईम देतात. सॅमसंगने यामध्ये IPX2 रेटेट बिल्ड फॉर वॉटर रेजिस्टन्सचीदेखील सुविधा दिली आहे जी 12mm च्या ऑडियो ड्रायवर्ससह मिळते. (Samsung Level U2 Neckband-Style Wireless Headphones With 18 Hours Music Playback Launched in India)

या नेकबँड स्टाईल वायरलेस हेडफोन्समध्ये जबरदस्त साऊंड क्वालिटीसाठी Scalable कोडेक टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या हेडफोन्सनी दक्षिण कोरियन मार्केटमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात डेब्यू केला होता. तिथे या हेडफोन्सना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर आता हे हेडफोन्स भारतात लाँच करण्यात आले आहेत. तर लेवल यू ची ओरिजनल हेडफोन्स सिरीज 2015 मध्ये लाँच करण्यात आली होती.

भारतात या हेडफोन्सची किंमत 1999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हे हेडफोन्स ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आले आहेत. हे हेडफोन्स तुम्ही फ्लिपकार्ट आणि सॅमसंग इंडिया ऑनलाइन स्टोरमधून खरेदी करू शकता. यामध्ये ब्लूटूथ 5.0 कनेक्टिविटी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये मायक्रोफोन्सदेखील देण्यात आले आहेत. हेडफोन्समध्ये AAC, SBC आणि Scalable कोडेकचा सपोर्ट देण्यात आला आहे.

सॅमसंगने हे हेडफोन्स उत्तमप्रकारे डिझाईन केले आहेत, जेणेकरुन तुम्ही अगदी सहज हे हेडफोन्स तुमच्या गळ्यात अडकवू शकता. हे हेडफोन्स प्रवासात वापरण्यासाठी चांगले आहेत. सोबतच तुमच्या कानांच्या आकारानुसार यामध्ये ईयर टिप्स देण्यात आले आहेत. याचाच अर्थ साऊंडसाठी तुम्हाला कोणताहा त्रास सहन करावा लागणार नाही. या हेडफोन्समध्ये कंपनीने तुम्हाला फिजिकल बटण्सही दिले आहेत ज्याद्वारे तुम्ही कॉल रिसिव्ह करु शकता, म्युट किंवा रिजेक्टही करु शकता.

हेडफोन्समध्ये कंपनीने इनबिल्ट बॅटरी दिली आहे जी 500 तासांपर्यंत स्टँडबाय टाईम, 18 तासांचा म्युझिक प्लेबॅक आणि 13 तासांचा टॉकटाईम देते. या सर्व गोष्टी सिंगल चार्जवर मिळतील. सोबत यामध्ये कंपनीने यूएसबी टाईप सी पोर्टदेखील दिला आहे.

सॅमसंग कंपनी स्मार्टफोन्ससोबत भारतात ऑडियो प्रोडक्ट्सवरही फोकस करत आहे. यामध्ये वायरलेस हेडफोन्स पासून ते ईयरबड्सपर्यंतच्या अनेक प्रोडक्ट्सचा समावेश आहे. हल्ली युजर्सना इयरफोन्स, हेडफोन्सऐवजी ईअरबड्स जास्त आवडू लागले आहेत. तसेच नेकबँड हेडफोन्सनाही चांगली मागणी आहे.

हेही वाचा

अवघ्या 7999 रुपयांमध्ये खरेदी करा Thomson स्मार्ट TV

अवघ्या 10 मिनिटात तुमचा फोन फुल चार्ज होणार, ढासू चार्जर लाँच होतोय

प्रतीक्षा संपली, Huawei चा फोल्डेबल फोन लाँच होतोय, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Samsung Level U2 Neckband-Style Wireless Headphones With 18 Hours Music Playback Launched in India)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.