हॉटेलमध्ये तुमचा तसा व्हिडीओ तर कोणी बनवत नाही! असा शोधाल छुपा कॅमेरा
सध्या तंत्रज्ञानाचं युग असून प्रत्येक गोष्ट झटपट होते. पण कधी कधी याच गोष्टी तुमचं खासगी आयुष्य उघड करतं. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे. असंच काहीसं स्पाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून होऊ शकतं. म्हणून हॉटेल रुममध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा छुपे कॅमेरे शोधणं आवश्यक आहे.
मुंबई : व्हॅलेंटाईन डे ला प्रेमाची कबुली दिल्यानंतर कपल्स आपल्या पार्टनरसोबत रोमँटिक क्षण घालवण्याची संधी शोधत असतात. यासाठी अनेक जण हॉटेल रुममध्ये जाणं पसंत करतात.घरापासून दूर एखाद्या हॉटेलमध्ये रुम बूक करतात. कारण हे ठिकाण कपल्सना सर्वात सुरक्षित वाटतं. मात्र अनेकदा छुप्या कॅमेऱ्यातून खासगी गोष्टी चित्रित केल्या जाण्याची शक्यता असते. हॉटेलमध्ये स्पाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून खासगी व्हिडीओ चित्रित करणं ही काय नवीन बाब नाही. असे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. तसेच ते क्षण सोशल मीडियावर लीक होण्याची देखील भीती असते. त्या माध्यमातून ब्लॅकमेल देखील केलं जाऊ शकतं. तसेच इमेजला ठेच पोहोचल्याने मानसिक धक्का देखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये गेल्यागेल्या काही बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे. हॉटेलमध्ये एंट्री मारल्या मारल्या छुपे कॅमेरे शोधणं गरजेचं आहे. काही टिप्सच्या मदतीने तुम्ही रुम किंवा वॉशरुममधील स्पाय कॅमेरा शोधू शकता.
हॉटेलमध्ये गेल्यानंतर कॅमेरा कुठे सेट केला जाऊ शकतो याचा अंदाज घ्या. पंखा, बेड, बल्बचं होल्डर, नाइट लँप, ड्रेसिंग टेबलचा आरसा किंवा एखादा शोपीस यात कॅमेरा लपवला जाऊ शकतो
स्पाय कॅमेरा शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हॉटेल रुम्सची लाईट बंद करावी. त्यानंतर मोबाईल टॉर्चने रुममधील सर्व जागेची तपासणी करा.
जेव्हा तुम्ही रुममधील लाइट बंद कराल तेव्हा एखादी लाइट रिफ्लेक्ट होण्याची शक्या असते. तेव्हा त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तपासणी करा. त्या ठिकाणी कॅमेरा लावलेला असू शकतो.
काही हॉटेलमध्ये छताला पीओपी सिलिंग केलेलं असतं. तसेच एसी वेंट्स असतं. त्या ठिकाणी चेक करा. कारण या ठिकाणी कॅमेरा लावलेला असू शकतो.
हॉटेलमधील टीव्ही, सेट-टॉप बॉक्स व्यवस्थित चेक करा. तसेच टीव्ही चालू करून बघा. कारण या ठिकाणी स्पाय कॅमेरा असू शकतो.
अनेकदा हॉटेलच्या वॉशरुमध्ये आरशामागे स्पाय कॅमेरा लपवलेला असतो.जर आरसा दुतर्फा असेल तर एकदा बोट आरशावर लावून तपासा. या ठिकाणी कॅमेरा लावण्याचं प्रमाण जास्त असतं.
हॉटेल रुममधील ड्रायर होल्डर, नल, डोअर नॉब या ठिकाणचे होल व्यवस्थित चेक करा. या ठिकाणी स्पाय कॅमेरा असू शकतो.
स्मार्टफोनमधील काही अॅप हॉटेलमधील छुपे कॅमेरे शोधण्यास मदत करतात. या अॅपचा तुम्ही सदुपयोग करु शकता. पण अॅप योग्य अयोग्य हे तपासून घ्या.