तुम्हाला एक चांगला उत्तम कॉलिटीचा स्मार्टफोन घ्यायचा आहे पण बजेट नसल्याने तुम्ही तो खरेदी करू शकत नाहीये. तर काळजी करू नका, तुम्ही सेकंड हँड स्मार्टफोन देखील खरेदी करू शकता. तुम्हाला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नूतनीकरण केलेले भरपुर स्मार्टफोन मिळू शकतात. पण या स्मार्टफोन्सबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहेत. असा स्मार्टफोन खरेदी करताना अनेकांना हाच प्रश्न पडेल की हे स्मार्टफोन खरेदी करणे एकतर फायदेशीर ठरेल किंवा नुकसान होईल. त्यामुळे तुमची द्विधामनस्थिती झालेली आहे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे स्मार्टफोन्स तुम्हाला ऑनलाइन स्वस्तात मिळू शकतात. हे खरेदी केल्याने तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही.
नूतनीकरण केलेल्या फोनबद्दल बोलायचे झाले तर, हे स्मार्टफोन अगदी नवीन नाहीत पण इतकेही जुने नाहीत की ते वापरता येणार नाहीत. बहुतेक लोक नवीन स्मार्टफोन घेताना ऑनलाइन एक्सचेंज ऑफरचा फायदा घेत असतात. अनेकांना वारंवार फोन बदलण्याची सवय असते. बाजारात नवीन फोन येताच हे लोकं अगदी दोन ते तीन महिने वापरलेले बदलून घेतात.
हे फोन काही दिवस किंवा महिन्यांसाठी वैध आहेत आणि एक्सचेंज ऑफर्सद्वारे विकले जातात. बहुतेक वेळा हे फोन वर्षभरही वापरले जात नाहीत.
किरकोळ दोष किंवा पसंत न पडल्यामुळे नूतनीकरण केलेले फोन विक्रेत्याला परत केले जातात. त्यानंतर परत केलेल्या फोनमधील काही छोटे दोष दुरुस्त केले जातात. यानंतर हे फोन अगदी नवीन होतात. त्यांनतर हे स्मार्टफोन ऑनलाइन विकले जातात.
या फोनची किंमत इतर नवीन फोनपेक्षा खूपच कमी असते. तुम्ही हे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon-Flipkart आणि Cashify वर पाहू शकता.
Oppo चा हा सिल्व्हर ग्रे रंगाचा स्मार्टफोन फक्त 18, 999 रुपयांना खरेदी करू शकता. मात्र या स्मार्टफोनची मूळ किंमत 38, 999 रुपये आहे. पण हा फोन नूतनीकरण केलेला असल्याने तुम्हाला तो कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. तर ओपोच्या या ब्रँडकडून एक वर्षाची वॉरंटी देखील दिली जात आहे. अमेझॉन प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार या फोनची तपासणी करण्यात आली आहे. तसेच या फोनच्या सर्व फंक्शनची टेस्ट घेण्यात आली आहे. Oppo Reno 10 हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा आहे.
12 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट असलेला पोकोचा हा स्मार्टफोन तुम्हाला 14,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तसेच हा फोन खरेदी करताना तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून 1,000 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता.