मार्क झुकरबर्गही आमचं ॲप वापरतात, सिग्नलनं व्हॉटसॲपच्या मालकाची फिरकी घेत सांगितलं कारण
सोशल मीडिया जाएंट मार्क झुकरबर्ग यांची फिरकी घेणार ट्विट सिग्नल ॲपनं केलं आहे. Signal App Mark Zuckerberg
नवी दिल्ली: सोशल मीडिया जाएंट मार्क झुकरबर्ग यांची फिरकी घेणार ट्विट सिग्नल अॅपनं केलं आहे. सिग्नलद्वारे मार्क झुकरबर्ग देखील सिग्नल अॅपवर आहेत, असं ट्विट करण्यात आलं आहे. व्हॉटसअॅपचे गोपनीयता धोरण स्वीकारण्याची मुदत जवळ येत आहे. त्यावेळीच मार्क झुरकबर्ग सिग्नल अॅप वापरात, अशा शब्दांमध्ये सिग्नल कडून झुकरबर्ग यांची खेचण्याचा प्रयत्न केला आहे. (Signal App take jibe of Mark Zuckerberg claimed he secretly using signal app rival of WhatsApp)
सिग्नल अॅपचं ट्विट
With the May 15th WhatsApp Terms of Service acceptance deadline fast approaching, Mark leads by example:https://t.co/Mt5YksaAxL
— Signal (@signalapp) April 6, 2021
फेसबूकचा डाटा लीक
मार्क झुकरबर्ग नेहमी वापरकर्त्यांच्या गोपनीयतेबद्दल कटिबद्ध असल्याचं बोलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी फेसबूकच्या 53.3 कोटी ग्राहकांचा डाटा लीक झाला होता. त्यामध्ये त्यांचे फोन नंबर, नाव, लोकेशन, वैवाहिक स्थिती, जन्मतारीख या बाबी लीक झाल्या होत्या. यामध्ये मार्क झुकरबर्गची माहिती देखील लीक झाली होती.
डेक वॉकरचा दावा
सुरक्षा संशोधक डेक वॉकर यानं झुकरबर्ग यांच्या लीक झालेल्या फोन नंबरवरुन ते सिग्नल अॅप वापरतात, असा दावा केला आहे. डेव वॉकरने त्यांच्या ट्विटमध्ये झुकरबर्ग गोपनीयतेबद्दल काळजी करतात त्यामुळे ते सिग्नल अॅप वापरतात, असं म्हटलं आहे. याशिवाय डेक वॉकरनं झुकरबर्ग यांचा फोन नंबर शेअर करत ते सिग्नल अॅप वापरतात ही चांगली गोष्ट असल्याचं म्हटलं आहे.
डेक वॉकरचं ट्विट
In another turn of events, Mark Zuckerberg also respects his own privacy, by using a chat app that has end-to-end encryption and isn’t owned by @facebook
This is the number associated with his account from the recent facebook leak. https://t.co/AXbXrF4ZxE
— Dave Walker (@Daviey) April 4, 2021
भारतातील 60 लाख व्यक्तींचा डाटा लीक
फेसबूकच्या 53.3 कोटी युजर्सचा डाटा लीक झाला होता. त्यामध्ये भारतातील 60 लाख युजर्सचा डाटा लीक झाल होता. त्यामध्ये फोन नंबर, नाव, लोकेशन, वैवाहिक स्थिती, जन्मतारीख या बाबी लीक झाल्या होत्या.
गोपनीयता धोरण स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 मे
व्हॉटसअॅपचे गोपनीयता धोरण स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 मे आहे. 2021 च्या सुरुवातीला व्हॉटसअॅपच्या गोपनीयता धोरणावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला होता. त्यांनंतर अनेक युजर्स सिग्नल अॅपकडे वळले होते. काही जणांनी व्हॉटसअॅप अकाऊंट बंद करुन टाकले होते. त्यामुळे गोपनीयता धोरण स्वीकारण्याची मुदत 15 मे पर्यंत वाढवण्यात आली. तर, 15 मे पर्यंत गोपनीयता धोरण स्वीकारलं नाही तर व्हॉटस अॅप अकाऊंट बंद होणार आहे.
संबंधित बातम्या:
व्हॉट्सअॅपवर आपला व्यवसाय वाढवेल हे फिचर, जाणून घ्या कसे बनवायचे बिझनेस अकाऊंट?
भारतात लाँच झाला Oppo F19 स्मार्टफोन, Paytm वरुन खरेदी केल्यास मिळेल जबरदस्त डिस्काउंट
Signal App take jibe of Mark Zuckerberg claimed he secretly using signal app rival of WhatsApp