VIDEO | कोंबड्याच्या अंगावर बसलं मांजर, मग कोंबड्याने मांजराला खूष केलं, नेटकरी म्हणतात…
कधी-कधी दोन प्राणी आपआपसात भांडताना दिसतात, तर कधी दोन प्राण्यांची मैत्री असल्याचं पाहायला मिळतं. मैत्री असलेले व्हिडीओ लोकांना अधिक आवडतात.
मुंबई : प्राण्यांची (Animal) सुद्धा एक दुनिया असते. ती आपल्याला अनेकदा आपल्याला एखाद्या घरात, अंगणात किंवा जंगलात (forest) पाहायला मिळते. त्यांची दोस्ती आणि दुश्मनी समजणे हे कोणात्याही इसमाला सहज शक्य नाही. कधी दोन जनावरं आपआपसात भांडत असतो, तर कधी वेगवेगळ्या समुहातील दोन प्राण्याचं बॉडिंग आपल्याला पाहायला मिळतं. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कोंबडा आणि मांजराची (chicken and cat) एक कमाला बॉन्डिंग दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला असून त्यावर कमेंट सुद्धा अधिक येत आहेत.
मांजराची आणि कोंबड्याची दोस्ती
इंस्टाग्रामवरती एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक कोंबडा आणि एक मांजर दिसत आहे. छोटं मांजर उडी मारुन कोंबड्याच्या अंगावर बसण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मांजर कसंतरी कोंबड्याच्या अंगावर चढतं. त्यानंतर कोंबडा मांजराला काही अंतर घेऊन जातो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असं वाटतं आहे की, मांजर आणि कोंबड्याचं एक मोठं नातं आहे.
दोघांमध्ये असलेलं बॉडिंग तिथं पाहायला मिळत
मांजर आणि कोंबड्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला लोकं अधिक पसंत करीत आहेत. व्हायरल व्हिडीओ ४ लाख ३१ हजार लोकांनी आत्तापर्यंत लाईक केला आहे. त्या व्हिडीओला आतापर्यंत अनेकांनी कमेंट केली आहे. व्हिडीओ इतका सुंदर आहे की, एक नेटकरी म्हणतो, दोघांमध्ये असलेलं बॉडिंग तिथं पाहायला मिळत आहे. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, दोघांच्यातलं एकमेकांवर असलेलं प्रेम त्यातून दिसत आहे. खरंतर हा व्हिडीओ अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे.
आतापर्यंत प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यामध्ये प्राणी एकमेकांवर किती प्रेम करतात हे स्पष्ट दिसत, असे व्हिडीओ नेटकऱ्यांना अधिक आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे.