फेस रिकग्निशनद्वारे तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांची चोरी

बीजिंग: स्मार्टफोनमधला डेटा सुरक्षित राहावा या दृष्टीकोनातून सर्व स्मार्टफोनमध्ये ‘फेस रिकग्निशन’ ही नवीन टेक्नोलॉजी कार्यरत केली आहे. या टेक्नोलॉजीमुळे फोनमधील सर्व डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो, असा दावा अनेक स्मार्टफोन कंपन्या करत असतात. पण याच टेक्नोलॉजीचा उपयोग करत चीनमधील एका व्यक्तीच्या अकाऊंटमधून तब्बल 1800 डॉलर म्हणजे जवळपास 1 लाख 25 हजार रुपये चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली […]

फेस रिकग्निशनद्वारे तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांची चोरी
व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवीन फीचर 'स्टोरेज अँड डेटा' च्या या पर्यायाच्या खाली 'स्टोरेज मॅनेज' अशा पर्यायामध्ये उपलब्ध असणार आहे. यासाठी एक नवीन स्टोरेज बार तयार करण्यात आला आहे.
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

बीजिंग: स्मार्टफोनमधला डेटा सुरक्षित राहावा या दृष्टीकोनातून सर्व स्मार्टफोनमध्ये ‘फेस रिकग्निशन’ ही नवीन टेक्नोलॉजी कार्यरत केली आहे. या टेक्नोलॉजीमुळे फोनमधील सर्व डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो, असा दावा अनेक स्मार्टफोन कंपन्या करत असतात. पण याच टेक्नोलॉजीचा उपयोग करत चीनमधील एका व्यक्तीच्या अकाऊंटमधून तब्बल 1800 डॉलर म्हणजे जवळपास 1 लाख 25 हजार रुपये चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे स्मार्टफोन क्षेत्रात फेस रिकग्निशन ही टेक्नोलॉजी असुरक्षित असल्याची चर्चा रंगली आहे.

नेमकं प्रकरण काय?

चीनमधील जेझियांगमध्ये राहणारा युआन हा रात्रीच्या वेळी रुममध्ये झोपला होता. त्यावेळी अचानक त्याचे दोन मित्र त्याच्या रुममध्ये शिरले. त्यानंतर त्यांनी युआनचा फोन घेतला. तो झोपेत असताना स्मार्टफोन फेस रिकग्निशनद्वारे त्याचा फोन सुरु केला. यानंतर त्या दोघांनी ‘वी चॅट’ या अॅपचा वापर करत 1800 डॉलर म्हणजेच 1.25 लाख स्वत: च्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले आणि त्या ठिकाणाहून पळ काढला.

युआनला जाग आल्यानंतर त्याला आपल्या अकाऊंटमधील पैसे चोरीला गेल्याचे समजले. त्यानंतर त्याने ताबडतोब पोलिस स्टेशनमध्ये या विरोधात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा संपूर्ण तपास कर त्याच्या मित्रांना अटक केली. तसेच युआनला त्याचे पैसही परत करण्यात आले. पण युआन नक्की कोणत्या कंपनी, ब्रॅंडचा फोन वापरत होता याबाबत काहीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मात्र या सर्व प्रकरणानंतर एका अधिकाऱ्याने युआनच्या फोनमधील फेस रिकग्निशन ही टेक्नोलॉजी सुरक्षित नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याचे डोळे बंद असतानाही त्याचा स्मार्टफोन सुरु झाला. पण या प्रकरणानंतर फेस रिकग्निशन या टेक्नोलॉजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

फेस रिकग्निशन टेक्नोलॉजी काय?

फेस रिकग्निशन सिस्टम या टेक्नोलॉजी सध्या जगभरात कार्यरत आहे. या टेक्नोलॉजीचा वापर सध्या सर्व स्मार्टफोन, सोशल मीडिया कंपनी, एअरपोर्ट यांसारख्या विविध ठिकाणी केला जातो. या टेक्नोलॉजीद्वारे तुमचा फोन तुमच्या चेहऱ्याच्या काही लाईव्ह फोटो किंवा व्हिडीओ सेव्ह करतो. त्यानंतर मोबाईलला पासवर्ड न टाकता सेन्सरद्वारे फेस रिकग्निशन केलं जाते आणि फोन सुरु होतो. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला पिन किंवा पासवर्ड टाकण्याची आवश्यकता भासत नाही.

पण या घटनेनंतर चीनमधील एका प्रसिद्ध टेक्नोलॉजी कंपनीने तुमचा मोबाईल फेस रिकग्निशनद्वारे सुरक्षित करण्यापेक्षा मोबाईल पासवर्ड किंवा पिनद्वारे सुरक्षित करावा. तसेच सोशल मीडियावरील पासवर्ड व इतर माहितीही पिनकोडद्वारे सुरक्षित करावेत.

पाहा व्हिडीओ:

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.